जेलुगडे येथे मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले. |
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
चंदगडचे भाजपा राज्य कार्यकारीणी सदस्य गोपाळराव पाटील व शतायुषी हाॅस्पीटल-अडकुर यांच्या माध्यमातून जेलूगडे (ता. चंदगड) येथे " मोफत आरोग्य शिबिर " आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळू कांबळे यांनी केले. सक्षम संघटनेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. शिबीरप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांना डाॅ. जे .आर. फगरे यांनी आरोग्याविषयी माहीती दिली. शिबीराचे उद्घाटन शशिकांत पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबीरात १७२ रूग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. शिबिराला सक्षम संघटनेचे सहकार्य लाभले. यावेळी गौरव सुर्यवंशी , नारायण घोरपडे यांच्यासमवेत ( सक्षम संघटना ) रामकृष्ण देवळी , नारायण गावडे , नामदेव गावडे व सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार शशिकांत गावडे यांनी मांडले.
No comments:
Post a Comment