चंदगड तालुक्यात गौराईचे आनंदमय वातावरणात आगमन - चंदगड लाईव्ह न्युज

05 September 2019

चंदगड तालुक्यात गौराईचे आनंदमय वातावरणात आगमन

चंदगड तालुक्यात गौराई आणताना महिलावर्ग.
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यात लाडक्या गणराया पाटोपाट येणाऱ्या गौरीच्या स्वागतासाठी आज घराघरातून सुहासनी नटून-थटून गावच्या पाणवठ्यावर ,नदी काठावर व तळ्यावर गौरी पूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. नववधू व सुहासनिने आज आपल्या ठेवणीतल्या साड्या नेसून नटून थटून गौरी सजवत त्या घरी आणल्या .आज जेष्ठा गौरीचे आगमन असल्याने सकाळपासून गौरी सजवण्याचा धांदल उडाली होती .गौरीचे डाळे शंकरबाची  पाने  या साहित्याने गौरी  सजवल्या होत्या .ग्रामीण भागात गावच्या पाणवठ्यावर या गौरी भरण्याचा कार्यक्रम होतो. याठिकाणी गौरीची गाणी झिम्मा फुगडी असा कार्यक्रम रंगतो.  तालुक्यातील सर्वच  गावागावात  दुपारी बारापर्यंत   गौरी भरण्याचा कार्यक्रम पार पडला.

No comments:

Post a Comment