चंदगड तालुक्यात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

05 September 2019

चंदगड तालुक्यात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात संपन्न

चंदगड तालुक्यात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 
चंदगड / प्रतिनिधी
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला प्राथमिक-माध्यमिक व  महाविद्यालयातून या कार्यक्रमाचं आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आलं होतं .चंदगड पोलीस स्टेशनच्या वतीने चंदगड मधील कन्या विद्यामंदिर व कुमार विद्यामंदिर येथील शिक्षकांना शुभेच्छा देऊन  गौरव करण्यात आला .आपल्या शिक्षका बद्दल  कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस ,शाळा महाविद्यालयात विद्यार्थी या दिवशी आपल्या शिक्षकाची भूमिका भूमिका पार पाडतात .शिक्षक नेहमीच आदरणीय राहिले आहेत. शिक्षकांना समाजाकडून प्रेरणा व धैर्य देण्याची गरज असते ज्यामुळे तो विद्यार्थी रुपी संपत्ती घडवेल. शिक्षक असा व्यक्ती आहे जो ज्ञान देतो आत्म प्रगतीकडे नेतो व जागरूकता निर्माण करतो आणि लोकांना शिक्षित करतो. तो एक असा प्रकाश आहे जो मार्ग दाखवतो .शिक्षकांना मान सन्मान पुरस्कार करण्याचा हा दिवस असल्याने चंदगड तालुक्यात सर्वच शाळांमधून आज मोठ्या उत्साहाने  शिक्षक दिन पार पाडण्यात आला. मात्र शासनांने नवीन शिक्षकांना अंशदायी पेन्शन योजना लागू करून जुनी पेन्शन योजना रद्द केल्याच्या निषेधार्थ आज सर्व शिक्षकाने काळ्या  फिती लावून  शासनाचा निषेध म्हणून  शिक्षक दिन पार पाडला.

No comments:

Post a Comment