श्री शिवशक्ती हायस्कूल अडकूर येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

05 September 2019

श्री शिवशक्ती हायस्कूल अडकूर येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

श्री शिवशक्ती हायस्कूल अडकूर येथे शिक्षक दिनानिमित्त डॉ . राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करताना प्राचार्य एस . जी . पाटील , एकदिवसीय प्राचार्या पूजा गावडे आदी.
तेऊरवाडी / प्रतिनिधी 
नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज अडकूर ( ता. चंदगड ) येथे माजी राष्ट्रपती डॉ . सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून मोठया उत्साहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस .जी . पाटील होते .
प्रारंभी डॉ .. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य श्री .एस. जे. पाटील  , एकदिवसीय प्राचार्या पूजा गावडे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी व्ही .एन. सुर्ववंशी , डी.एल. पाटील , सी.डी. जोशी , एस .डी. पाटील , पी .के. पाटील , प्रा . एम.पी. पाटील, प्रा .व्ही.पी. पाटील आदि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .  शाळचे एक दिवशीय अध्यापनाचे कार्य कॉलेजची प्राचार्या म्हणून पूजा गावडे , प्राध्यापक म्हणून अश्विनी नाईक , काजल पवार , काजल नाईक , निकिता फर्नांडिस , निकीता आंबीटकर , शृतिका देसाई , महादेव गावडे यानी कामकाज पाहीले . तर हायस्कूलचे अध्यापक म्हणून ओंकार शिंदे , संग्राम देसाई , सायली भेकणे , चेतना इंगवले , आस्मिता धुरी , सानिया कोवाडकर , प्राजक्ता तिबीले , प्रियांका इंगवले ,अंजली पवार यानी शालेय अध्यापनाचे काम केले .

No comments:

Post a Comment