नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे - जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

05 September 2019

नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे - जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आवाहन


कोल्हापूर / प्रतिनिधी
जिल्ह्यातील राधानगरी,कुंभी, कासारी, तुळशी, वारणा व दूधगंगा धरण परिसरात पावसाचे प्रमाण वाढले आहे. या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असून रात्रीतून पंचगंगा नदी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी  गावांनी सतर्क रहावे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले.
राधानगरी धरणाचे स्वयंचलित चार दरवाजे उघडले असून ७११२ क्यूसेक विसर्ग सुरु आहे. कुंभीमधून १८००, कासारीमधून १८००, तुळशीमधून १११०, वारणामधून ८३०५ व दूधगंगा धरणातून ८८०० क्युसेक विसर्ग सुरु आहे. सध्या राजाराम बंधार्याची पाणी पातळी २४ फूट ०१ इंच इतकी असून रात्रीतून ६ इंच वाढण्याची शक्यता आहे. कोयना धरणातूनही १० हजार क्युसेक विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment