शिवाजीराव पाटील यांच्याकडून बसर्गेतील अंध कुटुंबाला घर बांधकामासाठी 25 हजाराची रोख मदत - चंदगड लाईव्ह न्युज

05 September 2019

शिवाजीराव पाटील यांच्याकडून बसर्गेतील अंध कुटुंबाला घर बांधकामासाठी 25 हजाराची रोख मदत

बसर्गे (ता. चंदगड) येथील कांबळे कुटुंबियांना घर बांधकामासाठी 25 हजार रुपयांची रोख मदत देताना भाजप, स्वामी प्रतिष्ठान व माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, शेजारी इतर मान्यवर.
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यात महापुरामुळे घरे पडून अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. सामाजिक जाणिवेतून अशा कुटुंबांना मदत करण्याच्या उद्देशाने तालुक्यातील महापुरात घरे पडलेल्या 25 गरीब व गरजु व्यक्तींना स्वामी प्रतिष्ठान व भाजपच्या वतीने 25 घरे बांधून देण्याचे भाजपचे माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी जाहीर केले होते. त्यानुसार आज यांनी आज 25 पुरग्रस्तांपैकी बसर्गे (ता. चंदगड) येथील यल्लाप्पा कांबळे या अंध कुटुंबाला रोख 25 हजार रुपये घर बांधकामासाठी देवून या उपक्रमाची सुरवात केली.
या रोख स्वरुपातील मदतीमुळे कांबळे कुटुंबाला मोठा हातभार लागला आहे. उर्वरीत पुरग्रस्तांसाठीही लवकरच रक्कम उपलब्ध करुन देणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, माजी सभापती शांताराम पाटील, जि. प. सदस्य विद्या पाटील, गोविंद पाटील, संगयोचे तालुकाध्यक्ष सुनील काणेकर, श्री. परिट, रवी बांदिवडेकर, मोहन पाटील (पोलीस पाटील), विष्णू गावडे, रामू परसे, ॲड. विजय कडुकर, जयश्री पाटील (सरपंच बसर्गे), जे. बी. पाटील, विलास पाटील, लक्ष्मण गावडे, माधुरी सावंत भोसले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

                                                 चंदगड लाईव्हच्या बातम्याचा परिणाम
पुरकाळात व पुर ओसरल्यानंतरही चंदगड लाईव्ह न्युजने सर्व अपडेट वाचकापर्यंत पोहोचविण्याचे काम केले होते. महापुरात बसर्गे (ता. चंदगड) येथील कलाप्पा कांबळे या अंध कुटुंबाचे महापुराने घर पडून नुकसान झाले होते. या कुटुंबाची व्यथा चंदगड लाईव्ह न्युजने मांडली होती. हा व्हीडीओ पाहून भाजपचे माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी  या कुटुंबाला घर बांधून देण्याचे जाहीर केले. त्याची आज प्रत्यक्ष सुरवात झाल्याने चंदगड लाईव्ह न्युजच्या कामाबद्दल सर्वत्र स्तरातून कौतुक होत आहे.




No comments:

Post a Comment