ताम्रपर्णी नदीवरील कोनेवाडी बंधारा पाण्याखाली गेला असून या पाण्यातून धोकादायक वाहतुक सुरु आहे. |
शहर परिसरात आज दिवसभर पावसाची संततधार सुरुच आहे. पावसाच्या संततधारीमुळे चंदगड तालुक्यातील ताम्रपर्णी नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. त्यामुळे कोनेवाडी व हल्लारवाडी हे बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे. कोनेवाडी बंधारा पाण्याखाली गेल्याने कोनेवाडी व नांदवडे गावचा संपर्क तुटला आहे. जूनपासून कोनेवाडी व हल्लारवाडी हे दोन पुल तिसऱ्यांदा पाण्याखाली गेले आहेत. पावसाचा जोर असाच राहिल्यास उद्या सकाळपर्यंत चंदगड-हेरे मार्गावरील ताम्रपर्णी पुलही पाण्याखाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापुराच्या आठवणी ताज्या असतानाच पुन्हा पाऊस सुरु होवून पुरस्थिती निर्माण झाल्याने लोकांच्या मनात भितीचे वातावरण आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात 60.66 मिलीमीटर तर आतापर्यंत तालुक्यात 2906.33 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्कलनिहाय पाऊस असा - चंदगड – 70 मिमी (3554), नागणवाडी -59मिमी (2797), माणगाव -28मिमी (1506), कोवाड -36मिमी (1480), तुर्केवाडी -89मिमी (3011), हेरे -82मिमी (5090).
No comments:
Post a Comment