शिवाजीराव पाटील यांच्याकडून कोवाड व राजगोळी येथील कुटुंबांनाही आर्थिक मदत - चंदगड लाईव्ह न्युज

06 September 2019

शिवाजीराव पाटील यांच्याकडून कोवाड व राजगोळी येथील कुटुंबांनाही आर्थिक मदत


कोवाड (ता. चंदगड) येथे तुकाराम जोतिबा कोकीतकर या पुरग्रस्तांना आर्थिक स्वरुपातील मदत देताना भाजप, स्वामी प्रतिष्ठान व माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, दयानंद सलाम, नामदेवराव पाटील शेजारी इतर मान्यवर.
कोवाड / प्रतिनिधी 
चंदगड तालुक्यात महापुरामुळे घरे पडून अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. सामाजिक जाणिवेतून अशा कुटुंबांना मदत करण्याच्या उद्देशाने तालुक्यातील महापुरात घरे पडलेल्या 25 गरीब व गरजु व्यक्तींना स्वामी प्रतिष्ठान व भाजपच्या वतीने 25 घरे बांधून देण्याचे भाजपचे माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी जाहीर केले होते. कोवाड (ता. चंदगड) येथील तुकाराम जोतिबा कोकीतकर व राजगोळी बुद्रुकला श्रीमती आनंदीबाई सिध्यापा पाटील यांना प्रातिनिधिक स्वरूपात आर्थिक मदत दिली. या रोख स्वरुपातील मदतीमुळे कांबळे कुटुंबाला मोठा हातभार लागला आहे. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, माजी सभापती शांताराम पाटील, कोवाड व्यापारी संघटनेचेे अध्यक्ष दयानंद सलाम, संगयोचे तालुकाध्यक्ष सुनील काणेकर, श्री. परिट, रवी बांदिवडेकर, विष्णू गावडे, रामु पारसे, ॲड. विजय कडुकर, विलास पाटील, लक्ष्मण गावडे, माधुरी सावंत भोसले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment