![]() |
चंदगड-हेरे मार्गावरील ताम्रपर्णी नदीवरील पुलावर पुराचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतुक ठप्प आहे. |
चंदगड / प्रतिनिधी
गेले चार दिवस धुमाकुळ घालत असलेल्या पावसाने
आज काहीशी उसंत दिली आहे. तरीही अधून-मधून पावसाचा हलक्या सरी कोसळत आहेत. आज सलग
तिसऱ्या दिवशीही कोनेवाडी, हल्लारवाडी व करंजगाव हे तीनही बंधारे पाण्याखालीच
आहेत. त्याचबरोबर चंदगड-हेरे मार्गावरील चंदगड पुल पाण्याखाली गेल्याने त्या
मार्गावरील वाहतुकही काल दुपारनंतर ठप्प झाली आहे. या मार्गावरील वाहतुक
चंदगड-नागनवाडी-पाटणे फाटा-मोटणवाडी-हेरे मार्गे नांदवडे अशी वळविण्यात आली आहे.
त्यामुळे प्रवाशांना 25 किलोमीटरच्या भाड्याचा व वेळेचाही अपव्यय होत आहे. पावसाने
काहीशी उसंत दिली असल्याने उद्यापर्यंत चंदगड पुल व करंजगाव बंधाराही वाहतुकीला
खुल्या होण्याची शक्यता आहे. मात्र कोनेवाडी व हल्लारवाडी हे दोन्ही बंधारे
उद्याही पाण्याखाली राहण्याची शक्यता आहे. जांबरे धरण परिसरात जोरदार पाऊस सुरु
असल्याने या पाण्यामुळे कोनेवाडी व हल्लारवाडी बंधारे पाण्याखाली जातात. पावसाची
प्रमाण कमी असले तरी वातावरणात गारवा जाणवत असल्याने अनेकजण आजारी पडले आहेत. आज
सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात चंदगड तालुक्यात सरासरी 57.33 मिमी
तर आतापर्यंत 3017.33 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. संततधार पावसामुळे
मौजे इनाम सावर्डे येथील मधुकर भैरू गावडे यांच्या घरावर झाड पडून दहा
हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मंडलनिहाय पाऊस असा - चंदगड – 81 मिमी
(3701), नागणवाडी -66 मिमी (2920), माणगाव -30 मिमी
(1559), कोवाड -27 मिमी (1555), तुर्केवाडी -61 मिमी
(3125) व हेरे -79 मिमी (5244).
No comments:
Post a Comment