चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्याच्या वतीने मंगळवारी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

08 September 2019

चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्याच्या वतीने मंगळवारी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे आयोजन


चंदगड / प्रतिनिधी
अखिल भारतीय सरपंच परिषद अंतर्गत चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुका सरपंच संघटना आयोजित सरपंच, उपसरपंच, सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांचा मेळावा आयोजित केला आहे. मंगळवारी 10 सप्टेंबर 2019 रोजी र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या एन. एस. पाटील सभागृहात दुपारी बारा वाजता  होणाऱ्या या परिषदेचे आयोजन चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील सरपंच संघटनेने केल्याची माहीती चंदगड तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ पारसे यांनी दिली. 
परिषदेला महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह भोसले, राज्याचे अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील (कुर्डूकर), राज्याचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, प्रथम स्विय सहाय्यक केंद्रीय पेट्रोलियम मंत्री प्रकाश बेलवाडे, स्वामी प्रतिष्ठान व भारतीय जनता माथाडी कामगार संघ मुंबईचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, कोल्हापूर येथील राष्ट्रीय व्याख्यात्या सौ. राणी पाटील व कोल्हापूर जिल्हा संघटना अध्यक्ष सागर माने प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित रहाणार आहेत. सर्वांनी या परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गडहिंग्लज सरपंच संघटना अध्यक्ष विजय चव्हाण व आजरा सरपंच संघटना अध्यक्ष संभाजीराव सरदेसाई यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment