![]() |
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील जिल्हास्तरावर निवड झालेल्या कबड्डी संघासह मार्गदर्शक शिक्षक. |
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील सरस्वती विद्यालयाच्या खेळाडूंनी चंदगड तालुकास्तरीय शासकीय पावसाळी क्रीडा स्पर्धेमध्ये चौदावर्षीय मुलांच्या कबड्डी संघाने जयप्रकाश विद्यालय किणी संघावर चोवीस गुणांनी विजय मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. आरमान मोमीनच्या खोलवर चढाया आणि सुनिल पाटील याने केलेल्या पकडीने त्यांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली. कोवाड महाविद्यालयाचे प्राचार्य ए. एस. पाटील, प्राचार्य सी. बी. निर्मळकर यांनी अभिनंदन केले. क्रीडा शिक्षक आर. व्ही सावंत ई. एल. पाटील 'सुभाष बेळगांवकर प्रा. डी. एम. तेऊरवाडकर प्रा. रवी पाटील तसेच माध्यमिक व ज्युनिअर कॉलेजच्या सर्व शिक्षक व शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment