हुंदळेवाडी येथील तरुणांनी दिला ग्रामस्थांना मदतीचा हात - चंदगड लाईव्ह न्युज

08 September 2019

हुंदळेवाडी येथील तरुणांनी दिला ग्रामस्थांना मदतीचा हात

हुंदळेवाडी ( ता. चंदगड ) येथे बेघर झालेल्या प्रभाकर देसाई याना 32 हजारांची मदत देताना  नंदकुमार बेळगावकर , प्रशांत देसाई व ग्रामस्थ.
तेऊरवाडी / संजय पाटील 
कोवाडपासून केवळ दोन किमी . अंतरावर हुंदळेवाडी हे एक छोटसं गाव . पुराच्या आपत्ती मध्ये या गावान  एक दिलाने एकमेकाना मदतीचा हात दिला . महापुराच्या दणक्याने बेघर झालेल्या येथील प्रभाकर देसाई याना  आर्थिक मदत देऊन माणूसकीचे दर्शन घडवले . हुंदळेवाडी गावामध्ये कोणतीही आपत्ती आली की ती आपत्ती  आपलीच समजून संपूर्ण गाव आपत्ती ग्रस्थाच्या पाठीशी एक दिलाने उभा राहतो . याच गावाने सिद्धार्थ व सूरज देसाई हे राष्ट्रीय कबड्डीपट्टू  दिले .मागील महिण्यात  आलेल्या पुरात येथील ग्रामस्थ प्रभाकर देसाई यांचे घर उध्यस्थ झाले . श्री देसाई यांचे वर  आलेले संकट गावाने आपले संकट मानले . मग महापूरात १५ दिवस बंद असलेली वीज पूर्ववत करण्यासाठीची मदत असो अथवा १५ दिवस बंद  असलेला पाणीपुरवठा चालू करणे असो  या सर्वामध्ये गावातील सर्वानीच एकदिलाने काम केले . ग्राम पंचायत सदस्यांच्या मदतीने येथील  तरुणांनी एकमेकांच्या मदतीला धावून जातात. सुरू करणं हे इथल्यातरुणांच्या रक्तातच ठासून भरले आहे .
 ऑगष्ट महिण्यात पावसानं कहर केला. गरिबीचे चटके सहन येथील चंदगडकरानी महाप्रचंड महापूर   झेलला. मात्र  याअतिवृष्टीने  येथील ग्रामस्थ प्रभाकर देसाई याचे घर या महापूराच्या तडाख्यात  जमीनदोस्त झाले. उभं घर डोळ्यासमोर पडलेल पाहून प्रभाकर देसाई याना अश्रूंचा बांध फुटला..आता काय कराव हाच एक प्रश्न डोळ्यासमोर उभा होता. प्रत्येकाच्या मनाला चुटपूट लागून राहिली.. हरहुन्नरी  कार्यकर्ते नंदकुमार बेळगांवकर, प्रशांत देसाई, भाष्कर देसाई , शुभाष बेळगावकर, विनायक देसाई , नंदू देसाई , शेखर देसाई आणि त्यांची मित्रमंडळी व हुंदळेवाडी ग्रामस्थ या वॉट्स अॅप ग्रुप वरून मदतीची हाक सर्वांना दिली... ग्रामस्थांनी याला भरभरून प्रतिसाद  दिला.10 दिवसात तब्बल 32000 हजार रूपये जमा झाले. आज एकदिलाने तरुणांनी एकत्रीत येऊन ही रोख रक्कम  प्रभाकर देसाई यांना प्रदान केली.
एकमेका साह्य करू,  अवघेची धरू सुपंथ  .... या उक्तीचा प्रत्यय येथे आला. एकमेकाच्या पाठीशी आपण उभे राहीलेच पाहिजेत याची जाणीव सर्वांना झाली. नुकसानग्रस्थ प्रभाकर देसाई यांचेही मदतीची रक्कम  स्विकारताना डोळे भरून आले.गावकऱ्यांनी दिलेल्या या अमूल्य मदतीबदद्ल त्यानी सर्वांच मनापासून आभार मानले.

No comments:

Post a Comment