![]() |
पत्रकार कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना सहसंपादक सम्राट फडणीस शेजारी विनायक पाचलग , बी.के. कोमलभाई व इतर मान्यवर |
हेरले / प्रतिनिधी
सोशल मिडीयाचा फार मोठा फटका सध्या प्रिंट मिडीयाला बसत आहे . आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न केल्यास प्रिंट मिडीयाला येत्या दोन वर्षात मोठा फटका बसणार आहे. कृतीयुक्त बातमीदारीवर जास्तीत जास्त भर दयायला हवा .स्थानिक वेगळ्या बातम्यांना प्राधान्य दयायला हवे असे आवाहन दैनिक ' सकाळ ' चे सहसंपादक सम्राट फडणीस यांनी केले.
प्रजापिता ब्रह्माकुमारी कोल्हापूर युनिट, आर. ई.आर .एफ . मिडिया आणि कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने पत्रकारांसाठी कोल्हापूर येथील देशमुख हॉल येथे आयोजित केलेल्याा कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रजापिताा ब्रह्माकुमारी प.महाराष्ट्र प्रमुख सुनंदा बहनजी होत्या.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी केले. संघटनेच्या आजपर्यंत या वाटचालीचा आढावा त्यांनी प्रास्ताविकात घेतला. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ आणि सोशल मीडियाचे अभ्यासक विनायक पाचलग यावेळी बोलताना म्हणाले, आज संपूर्ण जग आपल्या मुठीत आहे त्याचे कारण आहे सोशल मिडीया . त्यामध्ये महत्वाची भूमिका आहे ती डीजीटल मिडीयाची. या पत्रकारीतेमध्ये विश्वासहर्ता ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे .स्पर्धा वाढत आहे त्यामुळे अचूक आणि खरी बातमी जे देतील तेच या स्पर्धेमध्ये टिकतील . सोशल मिडियाचा प्रभावीपणे वापर करणारेच पत्रकारितेमध्ये टिकतील. यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार समीर देशपांडे म्हणाले , कार्यशाळेतून पत्रकारांसाठी उपयुक्त अशी माहिती मिळत असल्यामुळे पत्रकारांचा गुणात्मक दर्जा वाढणार आहे. बी न्यूज चे ताज मुल्लाणी यांनी पत्रकारांसाठी चित्रीकरण कसे करावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले नवीन तंत्रज्ञानाची माहिती दिली.
ब्रह्माकुमारीचे मिडिया विभाग प्रमुख बी. के. काेमल भाई म्हणाले , सोशल मिडियाचा सध्या जास्त बोलबाला आहे . प्रत्येकजण संपादक आहे . अशामध्ये पत्रकारिता करणे मोठ्या कसोटीचे काम बनले आहे .पत्रकारिता दिशाहीन होण्याच्या मार्गावर आहे . त्याला सक्षम पर्याय निर्माण व्हायला पाहिजेत. अध्यक्षस्थानावरून बोलताना सुनंदा बहेन म्हणाल्या , पत्रकार हा समाजाचा आरसा असून त्यांनी एकत्रित येऊन काम केल्यास समाजाला विधायक दिशा मिळू शकेल व सुदृढ समाज बनण्यासाठी मोठे योगदान मिळेल. यावेळी जीवन साळोखे , दिनेश डांगे यांची मनोगते झाली . या वेळी ज्येष्ठ स्तंभलेखक दिनेश डांगे अॅड.,प्रशांत पाटील , सुनिल खोत , दत्तात्रय वारके , जीवन साळोखे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी, सचिव सुरेश पाटील, खजाणिस सदानंद कुलकर्णी,कौन्सिल मेंबर नंदकुमार कांबळे, प्रा.भास्कर चंदनशिवे,सुरेश कांबरे, दगडू माने,डॉ. निवास वरपे, दयानंद लिपारे, धनाजी गुरव, जिल्हा संघटक प्रा. रवींद्र पाटील, प्रसिध्दी प्रमुख भाऊसाहेब सकट, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश तिराळे,अनिल धुपदाळे, रविंद्र पाटील, तालुकाध्यक्ष महादेव कानकेकर , सचिनकुमार शिंदे,नंदू ढेरे, शिवाजी खतकर, अशोक पाटील, अमर वरूटे, संतोष तारळे, सुभाष बोरगे, आदीसह संघाचे पदाधिकारी व जिल्हयातील पत्रकार मोठ्या संख्येंनी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment