तेऊरवाडी येथील एकता फाऊंडेशनने घडवले एकतेचे दर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

09 September 2019

तेऊरवाडी येथील एकता फाऊंडेशनने घडवले एकतेचे दर्शन

तेऊरवाडी (ता . चंदगड ) येथे बेघराना मदत देताना एकता फौंडेशनचे कार्यकर्ते दयानंद पाटील , विष्णू बूच्चे
तेऊरवाडी / प्रतिनिधी
अतिवृष्टीने तेऊरवाडी ( ता. चंदगड ) येथे मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली .महापूर नसतानाही ओढ्यांचे पाणी घरात घूसून घरे पडल्याने अनेक जन बेघर झाले . अशा बेघराना तेऊरवाडीतील एकता फौंडेशनने माणूसकी जपत एकतेचा हात एकमेकांच्या हातात गुंफत बेघर झालेल्या गावातील ग्रामस्थांना मदतीचा हात दिला .विविध सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या या एकता फौंडेशनने समाजकार्यात ही मागे न राहता माणूसकीचे दर्शन घडवले .
येथील जवळपास सत्तर हून अधिक शेतकऱ्यांची घरे पडली आहेत . अनेक जन पूर्णतः बेघर झाले आहेत . शेतीचेही प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे . अशा परिस्थितीत येथील दयानंद मारूती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या एकता फौंडेशनने अशा बेघराना मदतीचा हात दिला . या फौंडेशनमध्ये अनेक माध्यमिक ते महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी , शिक्षक , सैन्य दलात कार्यरत असणारे जवान  आहेत. या सर्वानी काही क्षणात मोठ्या प्रमाणात निधी जमा केला . हा निधी गावातील बेघराना वाटण्यात आला . यामध्ये विठ्ठल पाटील , रामचंद्र पाटील , रमेश पाटील , उत्तम कांबळे , लक्ष्मण कुं . पाटील , मंगल कुंभार आदि शेतकरी कुटुंबप्रमूखाना या निधीचे वितरण करण्यात आले . शासनाच्या मदतीची वाट न पाहता या एकता गृप ने मदतीचा हात दिल्याने बेघरांच्या अडचणी काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे . दुर्गामाता दौड, युवकांसाठी विविध व्याख्याने , स्पर्धा परिक्षा , सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या एकता फौंडेशनच्या या कार्याबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे .

No comments:

Post a Comment