दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
प्लॅस्टर ऑफ पॅरिसने पर्यावरणाचा ऱ्हास होतो म्हणून पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग कमिन्स इंडिया फाऊंडेशन व NCL पुणे यांच्या विद्यामानाने समता प्रतिष्ठान पुणे अंतर्गत डॉ. प्रवीण देवन यांच्या मार्गदर्शनाखाली अमोनियम बाय कार्बोनेट याचा वापर करून किणीचे उपक्रमशील संजय कुट्रे यांनी आपल्या परस बागेत पर्यावरण प्रेमींनी दान केलेल्या 16 श्री मूर्तींचे प्लॅस्टिक टब मध्ये विसर्जन केले. निर्माल्य बागेतील झाडांना कंपोस्टखत म्हणून वापर केला. यापूर्वी हि त्यांनी गेली 2 वर्ष आपल्या शाडूच्या मूर्तींचे टबामध्ये विसर्जन करून शाडू व निर्माल्य परस बागेतील झाडांना वापर केला होता. त्यांच्या या पर्यावरण पूरक धाडशी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिस च्या श्री मूर्तीं रासायनिक रंगामुळे पर्यावरणाचा धोका होतो हे ओळखून पुढील वर्षांपासून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही अशा अभिनव पद्धतीच्या श्री मूर्तीचे पूजन करण्याचा मानस आहे.
No comments:
Post a Comment