![]() |
संजय मोरे |
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
“उद्योगावर व सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी उद्योगातून पैसा मिळवता येतो आणि सामाजिक कार्यातून माणुसकी मिळवता येते म्हणून शिवरायांच्या प्रेरणेतून उद्योगाबरोबर समाजकार्याचा वसा जपला पाहिजे असे प्रतिपादन शिवसंत संजय मोरे यांनी पुरस्काराला उत्तर देताना बोलत होते.
बेळगाव येथे गणेशोत्सव उत्सव अगदी थाटात चालू असताना श्री गणेश फेस्टिवल यांच्यावतीने सलग चार दिवस विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते गणेश फेस्टिवल च्या तर्फे ‘नवरत्न पुरस्कार ‘ प्रदान करण्यात आला. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील एक नामांकित महिंद्रा टू व्हीलर चे जिल्हा वितरक, बेळगांव कॉलेज रोड येथील यश अॅटोचे संचालक शिवसंत संजय मोरे यांना ‘उद्योगरत्न रत्न पुरस्कार ‘ देऊन सन्मानित करण्यात आले.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मूळचे राकसकोप गावचे संजय मोरे यांनी कॉलेज रोड बेळगाव येथे छोटासा व्यवसाय सुरू केला त्यातून एक उंच भरारी मारून उद्योग उभा केला. व्यवसायाबरोबर सामाजिक कार्य ,समाजाची बांधिलकी ,सामाजिक वसा त्याचबरोबर सेवाभावी वृत्तीने केलेलं कार्य या सार्या गुणांची पारख करून बेळगावातील नामांकित विविध सोसायटीच्या वतीने गणेश फेस्टिवल 2019 यावर्षीचा नवरत्न पूरस्कारामध्ये ‘उद्योगरत्न ‘ हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. संजय मोरे यांचा प्रामाणिकपणा, चिकाटी, जिद्द ,मेहनत आणि उद्योगावरील निष्ठा…. त्याचबरोबर कर्मचारी यांना दरवर्षी गड-किल्ल्यांचे मोहीम, गेली बावीस वर्ष वैयक्तिक शिवजयंती साजरी, बेळगावमधील विविध सामाजिक कार्यामध्ये सहभाग ,उद्योगाबरोबर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा उद्योगरत्न पुरस्कार बहाल करण्यात आला. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment