अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी शासनाने काढलेला आदेश फसवा - माजी खासदार राजू शेट्टी - चंदगड लाईव्ह न्युज

26 August 2019

अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी शासनाने काढलेला आदेश फसवा - माजी खासदार राजू शेट्टी

28 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्याचे नियोजन
कोवाड (ता. चंदगड) येथील पूरस्थितीची पहाणी करताना माजी खासदार राजू शेट्टी ,राजेंद्र गड्डयाण्णावर,बाळाराम फडके, प्रा. दिपक पाटील व इतर.
चंदगड / प्रतिनिधी
अतिवृष्टी व पुरग्रस्त  यामध्ये फरक न करता सरसकट कर्जमाफी करावी . शासनाने सध्या काढालेला आदेश हा फसवा असून सरकारच्या या आदेशामुळे 80 टक्के शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहणार आहेत .त्यामुळे ग्रामीण भागातील व्यापारी ,उद्योजक ,शेतकऱ्यांनी यांनी आपली  कैफियत मांडण्यासाठी 28 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी  कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार.त्यास तयार रहावे अशी माहिती  माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. चंदगड तालुक्यातील पूरग्रस्त व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कुटुंबांच्या भेटीदरम्यान त्यांनी ही माहिती दिली .
चालू वर्षी पावसाच्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरग्रस्त स्थितीत शेतकऱ्यांचे, उद्योजकांचे कंबरडे मोडले असून शासनाने काढलेला मदतीचा आदेश हा फसवा असून पूरग्रस्त व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या  सर्वांनाच सरसकट कर्जमाफी द्यावी .सरकारच्या षसध्याच्या आदेशामुळे 80 टक्के शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहणार आहेत. पुरामुळे पाच वर्षे शेतकरी  मागे केला असून शेतकऱ्यांची कैफियत मांडण्यासाठी येत्या 28 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर  आक्रोश मोर्चात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित असे आवाहन केले माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.ते चंदगड तालुक्यातील कोवाड विभागातील पूरग्रस्त राजगोळी, दुंडगे ,कोवाड ,निट्टूर, कोनेवाडी भागातील शेतकऱ्यांशी, छोट्या-मोठ्या उद्योजकांशी व  व्यापाऱ्यांशी संवाद साधून घरे पडल्या कुटुंबाशी जवळीक साधत संसारपयोगी साहित्य देत धीर दिला. यावेळी राज्य सचिव राजेंद्र गड्याण्णावर ,प्रा. दीपक पाटील, बाळाराम फडके ,सरपंच राजेंद्र पाटील, गजानन राजगोळकर ,शशिकांत रेडेकर यांच्यासह शेतकरी ,व्यापारी व उद्योजक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment