चंदगड / प्रतिनिधी
आपल्या वाहनांच्या गुन्ह्याबाबत आपल्याला जर अधिक माहिती हवी आहे तर पोलीसांचे महा ट्रॅफिक ॲप मोबाईल वरती डाऊनलोड करा. त्यावरती तुमच्या मालकीच्या मोटरसायकल, कार, ट्रक अशा वाहनाचा नोंदणी क्रमांक व चेसिस नंबर नोंद केल्यानंतर तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर त्या वाहनांनी महाराष्ट्रात कोठेही गुन्हा केला असेल तर त्याचा मेसेज तात्काळ तुम्हाला येणार असल्याचे आर. टी. ओ. इन्स्पेक्टर प्रदीप शिंंगारे यांनी सांगितले.
श्री. शिंगारे पुढे म्हणाले,, सिग्नल तोडणे, लेन तोडणे, सीटबेल्ट न लावणे, हेल्मेट परिधान न करणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलने तर अशा प्रकारचा कोणताही गुन्हा केला असेल तर त्याचा फोटो ट्रॅफिक पोलीस गुन्हा घडलेल्या वेळेचा फोटो सहित माहीतीॲपवर पाठवली जाते. या प्रकारच्या पद्धतीमुळे आता वाहन कोण चालवीत होते व कोणता गुन्हा केला याची संपूर्ण माहिती तुम्हाला एका एसएमएस द्वारे मिळणार असल्याचे कोल्हापूरचे आर. टी ओ. इन्सपेक्टर प्रदिप शिंगारे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment