![]() |
अडकूर (ता. चंदगड) येथे पंचायत समितीचे संरक्षण अधिकारी डी.डी. कवडे मार्गदर्शन करताना सोबत प्राचार्य एस .जी. पाटील व इतर. |
समाजामध्ये सद्या मोठया प्रमाणात नैतिकता कमी होत चालली आहे . शिक्षणाच्या मागे लागून सर्वजन डिग्रीसाठी धडपडत आहेत. पण या डिग्रींच्या मागे धावताना माणूस माणूसपण विसरत चालला आहे. यामूळेच शिकलेल्याकडून या कायद्याचा वापर तलवार म्हणून केला जात आहे. हे चुकीचे असून कायद्याचा वापर एक मजबूत ढाल म्हणून व्हायला हवा असे विचार पंचायत समिती चंदगडचे संरक्षण अधिकारी डी. डी. कवडे यांनी व्यक्त केले. श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज अडकूर (ता. चंदगड) येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित महिला, बालविकास व बालसंगोपन या विषयावर ते बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य एस. जी. पाटील होते.
ते पुढे बोलताना म्हणाले, आता सर्वजनच शिकायला शिकत आहेत पण माणूसकीने जगायला शिकत नाहीत . आपण भविष्यात नेमके काय बनायचे आहे ते ठरवणे महत्वाचे आहे . नाहितर केवळ पांगळे साक्षर बनू . शालेय जीवनातील हेच वय आदर्श जीवन घडण्यासाठी महत्वाचे आहे . या वयातच उद्याच्या उज्वल भविष्याची पेरणी करने गरजेचे आहे . निराधार बालकांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत . तसेच महिलांची घरी , समाज व नोकरीच्या ठीकाणी होणारी पिळवणूक रोखण्यासाठी कायद्यात विविध कलमे आहेत. यांचा योग्य तो वापर होणे गरजेचे असल्याचे सांगून केवळ शिक्षण झाले म्हणून लग्न नको तर कमवते झाल्यानंतरच लग्न करण्याचा सल्लाही श्री. कवडे यांनी उपस्थितांना दिला.`` प्राचार्य एस . जी . पाटील यांनी कोणतेही शिक्षण वाईट नसून या घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग समाज व देशासाठी करण्याचे आवाहन यावेळी बोलताना केले . या कार्यक्रमाला अडकूरचे पोलिस पाटील के .आर. गुरव , सौ . सुनीता गुरव , व्ही .एन. सुर्यवंशी , एस .के. पाटील आदि मान्यवर व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वंयसेवक उपस्थित होते . प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी प्रा . एम .पी पाटील यानी केले तर आभार प्रा . रामदास बिर्जे यानी मानले .
No comments:
Post a Comment