![]() | ||
तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे ओढयांचे पाणी शेतीत शिरुन पाण्याने मार्ग बदलल्याने शेतात चरीच्या-चरी पडल्या आहेत. त्यामुळे पिक वाहून गेले आहे. |
तेऊरवाडी / प्रतिनिधी
तालुक्यात आलेल्या महापुरामुळे तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे अतिवृष्टीने सर्वत्र पाणीच-पाणी झाल्याने ओढ्यांचे बांध फुटून पाण्याने प्रवाह बदलल्याने शेतीसह पिकाचा काही भाग वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
डोंगर उतारावर असणाऱ्या तेऊरवाडी या गावामध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामूळे येथील ओढे फुटून त्यातील पाणी शिवारात घुसल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेताचे मोठमोठे बांध फुटले आहेत. पाण्याच्या प्रवाहाने शेतातील जमीनच पिकासहीत वाहून गेली आहे. ओढे रिकामी पडले असून शेतातच नविन ओढे निर्माण झाले आहेत. शेतात मोठमोठ्या चरी पडल्याने चरीच्या आजूबाजूची मातीही घसरत आहे. पठार, कामत, रांगी, पालकारंग, मशार आदि शेतीतील सर्वच ओढ्यांनी शेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. त्याबरोबरच या शिवारात येणारे दिडगा, मका, मिरची, भईमूग, सोयाबिन हि पिके सुद्धा भुईसपाट झाली आहेत. ओढ्याचे पाणी गावातील घरामध्ये शिरल्याने घरांचीही पडझड झाली आहे. घरांचे पंचनामे पूर्ण झाले असले तरी शेतीचे पंचनामे ही तात्काळ होणे गरचेचे आहेत. त्याबरोबरच केवळ पिकांचे नुकसान न मोजता शेतजमिनीचे नुकसान विचारात घ्यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. येथील शेतकरी पुरग्रस्थ नसला तरी अतिवृष्ठी नुकसानग्रस्थ आहे. सरकारने याची दखल घेऊन येथील शेतकऱ्याना मदतीचा हात देणे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment