तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत दि न्यू इंग्लिश स्कूल प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

27 August 2019

तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत दि न्यू इंग्लिश स्कूल प्रथम

तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेले दि न्यू इंग्लीश स्कूलचे विद्यार्थी.

चंदगड / प्रतिनिधी
सेंट स्टीफन येथे सुरू असलेल्या तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धत १४ वर्षाखालील गटात दि न्यू इंग्लिश स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला. या संघाची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.
यामध्ये मंदार गायकवाड, रुपेश शेंडे, उज्ज्वल पवार, आदिल नाईक, आयान पटेल, मोहमद अवेज नाईक, रोहित कांबळे, गौरव वाडकर, उदय साळूंखे, आलिशान नाईकवाडी, पार्थ बल्लाळ, कृष्णा शिंगाडे यांनी यश मिळविले.तर १७वर्षांखालील गटात द्वितीय क्रमांक पटकावला. यामध्ये विनित चव्हाण, माज नाईक, आर्यन नाईक, लक्ष्मण लाडलक्ष्मीकार, अरजान नाईक, शुभम कांबळे, प्रथमेश गडकरी, तेजस शेंडे, दानिशमुजावर, मतीन नाईक, पांडूरंग गावडे आदिनी यश मिळविले. प्राचार्य व्ही. जी. तुपारे, उपप्राचार्य ए. जी. बोकडे, पर्यवेक्षक एस. आर. देवण यांनी अभिनंदन केले. क्रीडा शिक्षक प्रा. एन. डी. हदगल, व्ही. टी. पाटील, टी. व्ही. खंदाळे यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment