अतिवृष्टीच्या तडाख्याने कडलगे खुर्द शाळेचे छप्पर व भिंत कोसळून नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

27 August 2019

अतिवृष्टीच्या तडाख्याने कडलगे खुर्द शाळेचे छप्पर व भिंत कोसळून नुकसान

कडलगे खुर्द (ता. चंदगड) येथे अतिवृष्टीच्या तडाख्याने शाळेची इमारत कमकुवत होवून भिंत कोसळून छप्पर पडल्याने नुकसान झाले. 
कोवाड / प्रतिनिधी
कडलगे खुर्द (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेची इमारतीला अतिवृष्टीला तडाखा बसल्याने शाळेचे छप्पर व भिंत कोसळून नुकसान झाले. या शाळेच्या एका बाजूला अंगणवाडी इमारतीमधील 30 ते 34 मुले बसतात. मात्र घटनेवेळी मुले नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. 
कडलगे खुर्द (ता. चंदगड) येथे पहिली ते चौथीपर्यंत प्राथमिक शाळा असून ग्रामपंचायत खोलीमध्ये अंगणवाडी आहे. ही तीन खोल्यांची इमारत ही पूर्णपणे मोडकळीला आली होती. त्यामुळे शाळा स्तरावरून सदर बाब सरकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनाला आणून दिली. शाळेच्या एका खोलीचे निर्लेखन झालेले असून शाळा व्यवस्थापन समितीने मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. यावर्षी मुसळधार पाऊस झाल्यामुळे संपूर्ण इमारतीचे छप्पर व भिंती कोसळून ही घटना घडली. त्यामध्ये कोणतीही मनुष्य आणि झाली नाही.  पण कडलगे खुर्द गावासाठी शाळा आणि अंगणवाडी असा गंभीर प्रश्न लोकांसमोर उभा राहिला आहे. या गावांमध्ये शाळा व अंगणवाडी भरवणेसाठी इमारत नसल्यामुळे गावासाठी एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या प्रश्नी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून शाळेसाठी इमारत बांधून देण्यासाठी सरकारी दरबारी प्रयत्न करावेत अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. 

No comments:

Post a Comment