जट्टेवाडी येथे जनजागृती सभा
पहिल्यांदाच गावांच्या गावठाणची सरकारकडून मोजणी होणार असून त्यामुळे गावागावात आपापसातील तंटे होणार नाहीत. दोन घरांच्यामध्ये असणारी खुली जागा व सामायिक भिंतीवरही संबंधितांची मालकी सरकारकडे नोंद राहणार असल्याचे भूमिलेख सहाय्यक हरिशचंद्र निलवे यांनी सांगितले.
![]() | ||
जट्टेवाडी (ता. चंदगड) येथील ग्रामसभेत माहिती देताना हरिशचंद्र निलवे, शेजारी सरपंच पी. डी. पाटील, ग्रामसेविका मिनाक्षी रामगुडे व ग्रामस्थ. |
चंदगड / प्रतिनिधी
राज्याच्या ग्रामविकास, भुमिअभिलेख, महसूल विभाग आणि सर्व्हे ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने चंदगड तालुक्यातील 137 गावातील गावठाणची पहिल्यांदाच मोजणी होणार आहे. यापूर्वी तालुक्यातील 13 गावातील सर्वे पुर्ण झाला आहे. त्यामुळे गावागावातील हद्द निश्चिती होणार असून तंटे कमी होण्यास मदत होणार आहे. याबाबत प्रथम जट्टेवाडी (ता. चंदगड) येथे जनजागृती सभा घेऊन या कामाला प्रारंभ करण्यात आला.
मागील फेब्रुवारी महिन्यात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार या कामासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. पावसाळा संपताच जट्टेवाडी, गुडेवाडी या गावांना लागून असणाऱ्या परिसरातील 15 गावांत प्रथम मोजणी होणार आहे. त्यामुळे सरकारी मालकीच्या मिळकतीचे संरक्षण होणार असून मिळकतीचा नकाशा तयार होणार आहे. चंदगड भूमिअभिलेखचे सहाय्यक हरिशचंद्र निलवे, शहाजी पाटील हे प्राथमिक टप्यात संबंधित गावात जनजागृती सभा घेत आहेत. खाजगी मिळकती, ग्रामपंचायतीच्या मिळकती व सरकारच्या मिळकती कोणत्या यांच्या सीमा निश्चिती होणार आहेत. गावाला लागून असणारे ओढे व नाले यांची लांबी - रुंदीही स्पष्ट होईल. सर्व्हेक्षण झाल्यानंतर घरावर व घरठाणवर बँकाकडून नियमानुसार कर्जाची सुविधा उपलब्ध होईल. जट्टेवाडी ग्रामसभेला सरपंच पि. डी. पाटील, ग्रामसेवक मिनाक्षी रामगुडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. गुडेवाडी येथे झालेल्या जागृती सभेत सरपंच संजीवनी पाटील, ग्रामसेवक सुवर्णा जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
पहिल्यांदाच गावांच्या गावठाणची सरकारकडून मोजणी होणार असून त्यामुळे गावागावात आपापसातील तंटे होणार नाहीत. दोन घरांच्यामध्ये असणारी खुली जागा व सामायिक भिंतीवरही संबंधितांची मालकी सरकारकडे नोंद राहणार असल्याचे भूमिलेख सहाय्यक हरिशचंद्र निलवे यांनी सांगितले.
137 गावांसाठी ड्रोनचा वापर, 13 गावांचा सर्व्हे पुर्ण ................
पावसाळ्यानंतर पहिल्या टप्प्यात जट्टेवाडी, गुडेवाडी व माणगांवसह 15 गावांत मोजणी होईल. त्यानंतर उर्वरीत गावठणांची मोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर या गावात ड्रोन मंडळांची स्थापन करण्यात येणार आहे. ग्रामस्थांची बैठका घेवून जनजागृती केली जाणार आहे. सर्वे ऑफ इंडिया ही संस्था ड्रोनद्वारे मोजणीसाठी मदत करणार आहे. चंदगड तालुक्यातील चंदगड, हलकर्णी, अडकूर, निट्टूर, कालकुंद्री, तुर्केवाडी, बागिलगे व डुक्करवाडी, कोवाड व तेऊरवाडी, माणगाव, सुंडी व करेकुंडी, राजगोळी खुर्द, कुदनुर, तुडीये या 13 गावांचा सर्व्हे पुर्ण केला आहे.
(बातमी सौजन्य - संदिप तारीहाळकर, कागणी)
No comments:
Post a Comment