आतिवृष्टीने सरोळीत ऊस पिकांचे 5 कोटींचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

28 August 2019

आतिवृष्टीने सरोळीत ऊस पिकांचे 5 कोटींचे नुकसान

सरोळी ( ता. गडहिंग्लज ) येथे नदिकाठावरील  ऊस पिकाचे झालेले नुकसान.
नेसरी / प्रतिनिधी 
येथूनच जवळ असलेल्या सरोळी ( ता. गडहिंग्लज ) येथे या महिण्याच्या सुरवातीला झालेल्या अतिवृष्टी व महापुराने ऊस पिकाचे जवळपास ५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने या पिकांची तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी सरपंच  मारूती पाटील यानी केली आहे .
या महिण्यात झालेल्या अतिवृष्टीने सरोळी गावाजवळून वाहणाऱ्या घटप्रभा नदिला  प्रचड महापूर आला होता. बाराशे लोकसंख्या असणाऱ्या सरोळी गावची शेती गाणूचीवाडी  ते तावरेवाडी बंधाऱ्या पर्यंत आहे . संपूर्ण  
नदिकाठावर असणाऱ्या या शेतीमधे प्रचंड प्रमाणात ऊसाचे पिक आहे .पंधरा दिवस हा संपूर्ण ऊस पाण्याखाली राहिला . त्याचबरोबर पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने येथील ऊसच वाहून गेल्याने ऊसाचे प्रचंड नुकसान झाले आहे . येथील शेतकऱ्यांचे ऊस हेच पिक मुख्य आहे . याच पिकासाठी सेवा संस्था व सोसायटीकडून मोठी कर्जे घेतली असल्याने आता शेतकरी मोठया आर्थिक संकटात सापडला आहे. यातीलच ५  शेतकऱ्यांची पूर्णत : तर ४०  शेतकऱ्यांची अंशतः घरे पडली आहेत . शेतात पिक नाही तर गावात रहायला घर नाही अशा विचित्र अवस्थेत येथील शेतकरी आहे . घरांच्या व शेती नुकसानीचे पंचनामे झाले असले तरी ते पुरग्रस्थ निकशानुसार न होता अतिवृष्टी निकशाने झाले आहेत . त्यामूळे या नुसार मिळणारी मदत अत्यल्प असणार आहे . शासनाने याचा सर्वंकष विचार करून सरोळी गावातील शेतकऱ्याना योग्य ती नुकसान भरपाई देण्याची मागणी सरपंच श्री पाटील यानी केली आहे.

No comments:

Post a Comment