![]() |
अडकूर येथील शिवशक्ती हायस्कूलला पुणे येथील थायसन कृप इंडस्ट्रीज इंडिया पूणे, पिंपरी चिंचवड विज्ञान साहित्य भेट देण्यात आले. |
अडकूर (ता. चंदगड) येथील श्री शिवशक्ती हायस्कूलला पुणे येथील थायसन कृप इंडस्ट्रीज इंडिया पूणे, पिंपरी चिंचवड यांच्याकडून एक लाखाचे विज्ञान साहित्य भेट म्हणून देण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थी शैक्षणिक सुविधा मिळत नसल्याने प्रगती करु शकत नाही. अशा ग्रामीण भागांतील शाळामध्ये थायसन कृप कंपनी विविध सुविधा पुरवते. शालेय विद्यार्थ्याना वह्या, दप्तर देणे, शाळेसाठी शौचालय, पाणी फिल्टर योजना, संगणक, प्रोजेक्टर, विज्ञान साहित्य, विविध शैक्षणिक साहित्य या कंपनी कडून पुरवले जाते. यासह सार्वजनिक क्षेत्रासाठी, पुरग्रस्त, विविध आपत्ती मध्येही या कंपनीकडून मदतीचा हात दिला जातो. मागील वर्षीही या कंपनीने शिवशक्ती हायस्कूलला शालेय साहित्याचा पुरवठा केला होता. आताही जवळपास एक लाख रुपयांच्या विज्ञान साहित्याचा पुरवठा केला आहे. यामध्ये इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या सर्व विज्ञान साहित्याचा समावेश आहे. कंपनीचे अधिकारी निखिल देसाई, रमेश बसाण यांनी विज्ञान साहित्य देण्यासाठी योगदान लाभले. याकामी विद्यालयाचे अध्यापक संजय पाटील यांनी पाठपुरावा केला.
No comments:
Post a Comment