चंदगड / प्रतिनिधी
आजच्या विज्ञान युगात खूप मोठी प्रगती झाली आहे. खिशात पैसे ठेवून भीती बाळगत प्रवास करण्यापेक्षा पारदर्शक व्यवहार आणि मनावरील दडपण दूर राहण्यासाठी कॅशलेस व्यवहार चालू ठेवल्यास आनंददायी जीवन जगता येते, असे मत चंदगड तालुक्याचे आर्थिक साक्षरता विभागाचे प्रमुख जयवंत कुंभार यांनी व्यक्त केले. बागिलगे–डुक्करवाडी (ता. चंदगड) येथील ज्युनियर कॉलेज बागिलगे येथे नाबार्ड पुरस्कृत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध योजनांची माहिती देताना ते बोलत होते.
आज गुन्हेगारी जगतात पैसे खिशात ठेवून प्रवास करणे म्हणजे तणावग्रस्त प्रवास करणे असेच आहे. बँकेच्या नवीन व्यवहार पद्धतीची माहिती सर्वश्रृत व्हावी. यासाठी नवीन योजनांची अंमलबजावणी केल्यास जीवन आनंददायी बनू शकते. आजच्या विज्ञान युगात कॅशलेश व्यवहार पारदर्शक व गुप्तता पूर्ण व्यवहार असून सर्वांनीच या योजनेचा उपयोग करावा. या व्यवहारामुळे आपली सुरक्षितता अधिक वाढते व तणावमुक्त जीवन जगता येते असे मत चंदगड तालुक्याचे साक्षरता प्रमुख जयवंत कुंभार यांनी व्यक्त केले.`` नाबार्ड पुरस्कृत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने एटीएम सुरक्षा व वापर, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेची माहिती, शैक्षणिक कर्ज योजनेची माहिती, विद्यार्थी योजनेची माहिती, कॅशलेस व्यवहार याबाबत बँकेच्या वेगवेगळ्या व्यवहाराची माहिती, एटीम कार्डव्दारे कॅशलेस व्यव्हार कसा करावा यासाठी प्रोजेक्टरचा वापर करुन ही कार्यशाळा येथील बागिलगे -डुक्करवाडी ज्युनियर काॅलेजमध्ये संपन्न झाली. यावेळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माणगाव शाखेचे निरीक्षक नामदेव पाटील, प्राचार्य एस. एम. कांबळे, सहकार विषय पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळचे सदस्य प्रा. पी. जे. बोकडे व विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment