![]() | ||
| सामना फाऊंडेशनच्या वतीने पुरग्रस्त विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना फाऊंडेशनचे पदाधिकारी. |
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पुरपरिस्थीतीमुळे जिल्ह्यातील अनेक नागरिकांचे संसार उध्वस्थ झाले. अनेकांना घर सोडून अन्यत्र स्थलांतर करावे लागतो. शेती पाण्याखाली गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. जनावारांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला. दुकानामधून पाणी शिरल्याने व्यापारी वर्गही देशोधडीला लागला आहे. अशा परिस्थितीत पुरग्रस्तांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने सामना फाउंडेशनने खरोखरच मदतीची गरज असलेल्या चंदगड तालुक्यांतील पुरस्थीतीचा फटका बसलेल्या व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थांना मोफत शैक्षणिक वस्तुंचे वाटप केले. यावेळी सामना फाउंडेशनचे अध्यक्ष सुधीर पाटील यांच्यासोबत अंकुश मद्री, मोहन अमृस्कर, मोहन पाटील, दत्ताराम गावडे यांनी मदतकार्यात सहभाग घेतला होता.


No comments:
Post a Comment