दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
सहकार क्षेत्रातील नामवंत महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा येथे कार्यरत असणार्या नवहिंद मल्टीस्टेट को ऑफ क्रेडीट सोसायटी व न्यू नवहिंद मल्टीपर्पज मल्टीस्टेट को-ऑफ क्रेडीट सोसायटी येळळूर (बेळगाव) यांच्या सहयोगातून चंदगड तालुक्यातील पूरग्रस्तांना एक लाखाच्या आर्थिक मदतीचा धनादेश तहसीलदार विनोद रणवरे यांच्याकडे चेअरमन उदय जाधव यांनी सुपूर्द केला.
चंदगड तालुक्यात 15 दिवसापूर्वी मुसळधार पावसाने थैमान घातले होते. नद्यांना आलेल्या महापुरामुळे अनेकांची आर्थिक हानी झाली. अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. यामुळे आपल्या कार्यक्षेत्रात आपण ही थोडा खारीचा वाटा उचलूया या सामाजिक भावनेच्या बांधिलकीतून संयुक्तरीत्या नवहिंद परीवारामार्फत दोन्ही आर्थिक संस्थाच्या सर्व कर्मचार्यांचे एक दिवसाचे वेतन व संचालक मंडळाचा एक महिन्याचा भत्ता अशी मिळून एक लाख रुपये मदत देण्याचे स्वतंत्रदिना दिवशीच्या कार्यक्रमात ठरवण्यात आले होते. त्या मदतीचा धनादेश आज (गुरुवारी) तहसिलदारांच्याकडे सोपविण्यात आला. यावेळी नवहिंद मल्टीस्टेट को-ऑफ क्रेडीट सोसायटीचे चेअरमन उदय जाधव, व्हाईस चेअरमन संभाजी कणबरकर, संचालक एल. आय. पाटील, सी. बी. पाटील, शिवाजी सायनेकर, प्रकाश अष्टेकर, न्यू नवहिंद मल्टीपर्पज मल्टीस्टेट को-ऑफ सोसायटीचे व्हाईस चेअरमन दशरथ पाटील, संचालक दत्ता उघाडे, वाय. एन. पाटील यांच्या हस्ते तहसीलदारांच्याकडे देण्यात आला. शाखाधिकारी युवराज शिंदे, विनोद पाटील उपस्थित होते.


No comments:
Post a Comment