`मस्ती की पाठशाला` या व्हाट्सएप्प ग्रुपच्या माध्यमातून किटवडे येथील पुरग्रस्त महिलेला मदत - चंदगड लाईव्ह न्युज

29 August 2019

`मस्ती की पाठशाला` या व्हाट्सएप्प ग्रुपच्या माध्यमातून किटवडे येथील पुरग्रस्त महिलेला मदत

तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील जनता विद्यालयाच्या 2003 दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या 'मस्ती की पाठशाळा' या व्हॉटस अॅपच्या वतीने किटवडे येथील पूरग्रस्त सावित्री कदम मदत दिली. जपली. 
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
आजच्या व्हाटसअपच्या जमान्यात हजारो ग्रुप सक्रिय आहेत. समाज माध्यमांचा विविध बऱ्या वाईट कारणासाठी वापर केला जात आहे. मात्र या माध्यमांचा समाजाच्या हितासाठी ही उपयोग करता येऊ शकतो. हे तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील जनता विद्यालयच्या 2003 दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या 'मस्ती की पाठशाळा' या व्हॉटस अॅप वर्ग मित्रांच्या ग्रृप च्या सदस्यांनी किटवडे गावातील पूरग्रस्त सावित्री कदम यांना तांदूळ, डाळी, तेल व रोख 10 हजार रुपये देऊन सामाजिक बांधिलकी जपली. 
नुकत्याच झालेल्या महापुराने अनेकांचे संसार उद्धवस्त झाले.तालुकयातील कलानंदीगडाच्या पायथ्याशी वसलेल्या कलीवडे गावात तानबा कदम यांचे राहते घर 6 आंगस्ट च्या मुसळधार पावसामुळे कोसळले 75 वर्षीय कदम हे लकवा या आजाराने अंथरुणाला खिळून आहेत.त्यांची पत्नी सावीत्री कदम एकट्याच पतीची सेवा करीत आहेत.पण ऐन पावसात एकमेव आधार असलेले घरचं कोसळले आहे,घरात हक्काचं असे कोणी च नाही.व व असे अकालनीय संकट त्यांच्यावर   कोसळले व सारं उध्दवस्त झाले आहे.अशा आशयाची बातमी वाचली व मन सुन्न झालेल्या विनोद पाटील यांनी आपण ही यांच्यासाठी काय तरी करूया या भावनेने आपल्या ग्रृपवर ,,,, मोडुन पडला संसार जरी मोडला नाही कणा,,, पाठीवरती हात ठेउन फक्त लढ म्हणा.....एक हाक मदतीची...हाक माणुसकी ची....या मथळ्याखाली मदतीनिधी साठी आपल्या परीनं शक्य तितकया मदतीचे योगदान द्यावे असे आवाहन केले.
काही मित्रांनी रोख स्वरूपात तर पुणे मुंबई स्थित असणारयांनी आंनलाईन ,तर काही सैनिक मित्रांनी देशसंरक्षण करत थेट आपली मदत जमा केली.परदेशस्थित वर्गमित्रांनी हि मदतीला हातभार लावला. व थेट पुरग्रस्त सावित्री कदम  यांच्या हाती रोख 10 हजार व रेशन सुपूर्द केला, यावेळी आपदा मित्र, जीवरक्षक कमलेश जाधव, विनोद पाटील, रविंद्र कोनेवाडकर, मोहसीन मुल्ला,सागर चौगुले, विकास कांबळे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment