कोवाड महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीड़ा व फिट इंडिया मूवमेंट कार्यक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

30 August 2019

कोवाड महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीड़ा व फिट इंडिया मूवमेंट कार्यक्रम

कोवाड महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीड़ा व फिट इंडिया मूवमेंट कार्यक्रम संपन्न झाला. 
कोवाड / प्रतिनिधी
कोवाड (ता. चंदगड) येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीड़ा व फिट इंडिया मूवमेंट असा संयुक्त कार्यक्रम प्र. प्राचार्य डॉ. एस. एम. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. हॉकीचे जादूगर अशी ओळख असलेल्या मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. 
प्रा. आर. टी. पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात मेजर ध्यानचंद यांची ओळख व त्यांनी दिलेल्या आपला राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकी बद्दलच्या योगदानाविषयीच्या माहिती दिली. देशाचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या 'फिट इंडिया मूवमेंट' बद्दलची माहिती देऊन मानवी जीवनामध्ये आरोग्याचे महत्व सांगितले. प्रा. डॉ. एस. एम. पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सर्व विद्यार्थ्याना खेळाच्या माध्यमातून आरोग्य कशाप्रकारे जपता येईल याची माहिती दिली. त्यानंतर डॉ. ए. एस. आरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली ओंकार व योगाची प्रात्यक्षिके घेण्यात आली. शा. शि संचालक प्रा. आर. टी. पाटील यांनी विविध व्यायाम प्रकारचे प्रात्यक्षिक देऊन आरोग्याच्या दृष्टिने व्यायामाचे महत्व सांगितले. यावेळी सर्वांनी 'सदृढ़ भारत व स्वच्छ भारत' घडविण्याची शपथ घेतली. कार्यक्रमाला खेळाडू, विद्यार्थी व सर्व शिक्षक मोठ्या संखेने उपस्थित होते. प्रा. एम. एस. घोळसे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एस. एन. कांबळे यांनी आभार मानले. 

No comments:

Post a Comment