![]() |
चंदगड येथील माडखोलकर व हलकर्णी येथील चव्हाण महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागांमध्ये सामंजस्य करार झाला. |
चंदगड येथील र. भा. माडखोलकर व हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाने सामंजस्य करार केला.
चंदगड तालुका हा जैवविविधतेने नटलेला आहे. पश्चिम घाट हा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आहे. आजही पश्चिम घाटात अनेक दुर्मिळ प्रजातींचे वन्यजीव आढळतात. झपाट्याने नष्ट होत चाललेल्या या प्रजातींचे संशोधन व संवर्धन करण्याची आज गरज आहे. विद्यार्थ्यांना या प्रजातीचे संशोधन व संवर्धन याविषयी मार्गदर्शन घेणे या करारामुळे शक्य होणार आहे. विद्यार्थ्यांना क्षेत्रीय कार्य, छायाचित्रण, प्रजाती ओळखणे इत्यादी कौशल्ये शिकवली जाणार आहे. सरकार व लोकसहभागातून पर्यावरण टिकून ठेवण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याचीही गरज आहे. विद्यार्थ्यांच्या योगदानामुळे त्यांचे व्यक्तिगत भवितव्य व पर्यावरणाचे रक्षण हे दोन्ही हेतू या कराराने साध्य होतील. यावेळी माडखोलकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील, चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. वाय. निंबाळकर, प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. के. एन. निकम, डॉ. एन. सी. हिरगोंड, नॅक समन्वयक डॉ. एम. एम. माने, डॉ. आर. आय. जरळी आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment