संजय गांधी योजनेची 85 प्रकरणे मंजूर, मात्र दोन महिने मानधनच नसल्याचे अडचण - चंदगड लाईव्ह न्युज

30 August 2019

संजय गांधी योजनेची 85 प्रकरणे मंजूर, मात्र दोन महिने मानधनच नसल्याचे अडचण

संजय गांधी स्वावलंबन समितीचे तालुकाध्यक्ष सुनिल काणेकर यांचे स्वागत करताना तहसिलदार विनोद रणवरे व इतर. 
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुका संजय गांधी स्वावलंबन समितीची बैठक तालुकाध्यक्ष सुनिल काणेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत तालुक्यातील 85 प्रकरणे मंजूर करण्यात आली. मात्र जून पासूनचे मानधन लाभार्थ्यांना मिळाले नसल्याची तक्रार करण्यात आली. 
सचिव तथा तहसिलदार विनोद रणवरे यांनी स्वागत केले. यावेळी तालुक्यातील विविध योजनातील प्रलंबित प्रश्नावर चर्चा करण्यात आली. यावेळी तहसील कार्यालयातून विधवा अपंग व इतर योजनेतील लाभार्थ्यांचे पैसे वेळेवर पाठवले जातात. पण जिल्हा बँके दोन-दोन महिने लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसै जमा करत नाही. त्यामुळे वयस्कर, अपंग, लाभार्थीची बँकेकडे फेऱ्या मारुन दमछाक होते अशी तक्रार भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन पिळणकर यांनी केली. यापुढील सर्व लाभार्थ्यांना पैसे ऑनलाईन पद्धतीने पाठवले जातील असे आश्वासन नूतन अध्यक्ष सुनील काणेकर यांनी दिले. यावेळी श्री. काणेकर यांचा सत्कार तहसीलदार विनोद रणवरे यांनी केला. यावेळी सदस्य शांता जाधव, जानबा कांबळे, प्रिती गवारी, दत्ता नाईक, शितल कट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.


No comments:

Post a Comment