एक गाव एक गणपतीमध्ये पोवाचीवाडी, सार्वजनिकमध्ये माणकेश्वर माणगाव प्रथम, चंदगडला गणराया ॲवार्ड वितरण - चंदगड लाईव्ह न्युज

26 August 2019

एक गाव एक गणपतीमध्ये पोवाचीवाडी, सार्वजनिकमध्ये माणकेश्वर माणगाव प्रथम, चंदगडला गणराया ॲवार्ड वितरण

चंदगड पोलिस ठाण्याच्या वतीने गणराया ॲवार्ड वितरण
चंदगड येथे गणराया ॲवार्ड वितरण कार्यक्रमात सार्वजनिक गणपतीमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षिस स्विकारताना माणकेश्वर मंडळाचे कार्यकर्ते. 
चंदगड / प्रतिनिधी
जिल्हासह चंदगड तालुक्यावर महापुराचे संकट ओढवले होते. त्यामुळे अनेकांचे संसार व व्यापारी वर्गही उध्दवस्थ झाला आहे. सामाजिक जाणिवेतून या घटकांना मदतीचा हात देणे सर्वांची जबाबदारी आहे. गणेशोत्सव मंडळांनी पुरग्रस्तांना मदत करुन समाजापुढे आदर्श ठेवावा असे आवाहन तहसिलदार विनोद रणवरे यांनी अध्यक्षीय भाषणात केले. चंदगड येथे गणराया ॲवार्ड वितरण कार्यक्रमावेळी बोलत होते. पोलिस दलाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 
पोलिस निरिक्षक ए. एस. सातपुते यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात एक गाव एक गणपती हि संकल्पना राबवून मंडळांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. साध्या पध्दतीने डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करुन दुर्बळ घटकांना मदत करा असे आवाहन केले. एक गाव एक गणपती यामध्ये श्रमिक गणेशोत्सव मंडळ पोवाचीवाडी यांनी प्रथम, रवळनाथ गणेशोत्सव मंडळ हलकर्णी यांनी द्वितीय, जय हनुमान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कुर्तनवाडी यांनी तृतीय तर उत्तेजनार्थ बक्षीस छावा कला-क्रीडा गणेशोत्सव मंडळ म्हाळेवाडी यांना देण्यात आले. 
सार्वजनिक गणपतीमध्ये माणकेश्वर गणेशोत्सव मंडळ माणगाव यांनी प्रथम क्रमांक, अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ अडकुर याने तृतीय क्रमांक, रवळनाथ गणेशोत्सव मंडळ चंदगड यांना तृतीय तर अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ सातवणे यांना उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले. चंदगड पोलीस ठाण्याच्या वतीने कुदनुर येथील गणेश सुतार यांना उत्कृष्ट मूर्तिकार, नवक्रांती गणेशोत्सव मंडळ कुदनुर त्यांना उत्कृष्ट मूर्ती तर उत्कृष्ट देखाव्यासाठी अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ जंगमहट्टी यांना बक्षीस देण्यात आले. शिस्तबद्धता व गणेश विसर्जन मिरवणूक यासाठी गणेशोत्सव मंडळ माणगांव यांना हा मान देण्यात आला. गणराया ॲवार्ड वितरण कार्यक्रमासाठीची सर्व बक्षिसे अंजुमन ए ईस्लाम चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या वतीने देण्यात आली होती.
यावेळी अभियंता एम. एफ. मुल्ला, रावसाहेब कसेकर, दिपक पाचवडेकर, दिलीप येसादे, अमर सायेकर, माधुरी पाटील, विद्या तावडे, तजमुल फणीबंद आदीसह पोलिस पाटील, मंडळाचे पदाधिकारी, मोहल्ला कमिटीचे पदाधिकारी यांच्यासह तालुक्यातील विविध गणेश मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होेते. एम. एस. कानूरकर यांनी सूत्रसंचालन केले. चंदगडचे पोलीस निरीक्षक ए. एन. सातपुते यांनी आभार मानले.  

No comments:

Post a Comment