अरविंद काळे |
एक गाव एक गणपती व साध्या पध्दतीने गणेश उत्सवाचे तरूण मंडळांनी आयोजन करून पूरग्रस्त बांधवांना यथाशक्ती आर्थिक मदत सामाजिक बांधिलकी जपत करावी असे आवाहन प्रसारमाध्यमांशी बोलतांना नुतन हातकणंगले पोलिस ठाणे प्रमुख पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांनी केले आहे.
काही दिवसापूर्वीच हातकणंगले पोलिस ठाण्याचे प्रमुख पी.आय.अरविंद काळे यांनी पदभार स्विकारला आहे.पूरग्रस्त स्थितीत त्यांनी ठाणेअंतर्गत येणाऱ्या पुरग्रस्त गावांना भेटी देऊन त्यांना मदत, शांतता व सुव्यवस्था राखण्याचे कार्य केले आहे. पुढील महिन्यात गणपती बाप्पाचेआगमन होऊन गणेश उत्सव साजरा होणार आहे. विविध तरूण मंडळे मोठया आनंदात भक्तिभावपूर्ण वातावरणात गणेश उत्सव साजरा करतात. मात्र सध्या महापूरामुळे कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान, घरांची पडझड, प्रापंचिक साहित्याचे नुकसान पशुधनमृत आदीतून वित्तहानी होऊन समाजाचे अतोनात नुकसान झाले आहे.
त्या धर्तीवर सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी व पुरग्रस्त बांधवांच्या संकटात तरूण मंडळांची मदत होणेसाठी पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांनी हातकणंगले पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गावातील तरूण मंडळांना एक गांव एक गणपती उत्सवाचे आयोजन करणे, डॉल्बी विरहीत गणेश उत्सव साजरा करणे, पारंपारिक वादयांचा वापर करणे , भव्य दिव्य देखावे करण्याचे टाळावे, गणेश आगमन मिरवणूक व विसर्जन मिरवणूक साध्या पध्दतीने करुन आदीसह मोठ्या खर्चास फाटा दयावा. त्या आर्थिक निधीची बचत करीत पुरामध्ये ज्या कुटुंबाचे नुकसान झाले आहे. त्यांना गावपातळीवर तरूण मंडळांनी आर्थिक मदतीसह, प्रापंचिक वस्तू, कपडे, मुलांचे शैक्षणिक साहित्य, अंथरून पांघरून, पशुना चारा आदींची मदत करावी. पुरग्रस्तावर अस्मानी आलेल्या संकटात ज्या पध्दतीने समाजातील सर्व घटकांनी मदत केली आहे. तशी तरूण मंडळांनी या सालातील गणेशउत्सव साध्या पध्दतीने करून पुरग्रस्तांना यथाशक्ती मदत करावी. तसेच गणेश मंडळांनी गणेश उत्सवासाठी लिखीत स्वरूपात पोलिस ठाणेकडून परवानगी घेऊनच गणेश उत्सवाचे आयोजन करावे असे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment