![]() |
हिंडगाव (ता. चंदगड) येथे गरजु पुरग्रस्तांना मदत देताना प्रवीण फाटक व सहकारी. |
चंदगड / प्रतिनिधी
गेले पंधरा दिवस पूर परिस्थिती संपूर्ण तालुकाभर असताना हिंडगाव या गावालाही अतिवृष्टीचा तडाखा बसला. या गावाच्या लोकांच्या मदतीला प्रवीण प्रकाश फाटक यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यां शेतकऱ्यांना रोख रक्कम देऊन मदत केली. प्रवीण फाटक हे पुणे येथे सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरीला आहेत. त्यांचे मूळ गाव हिंडगाव असून त्यांचा भाऊ नितीन फटक यांच्याकडून तालुक्यातील व गावाकडील पूर परिस्थितीचा माहिती घेत होते. पुर ओसरल्यानंतर गावांमध्ये येऊन प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांची अतिवृष्टी व पुरामुळे घरे पडली होती. शेतीचेही नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. हे पाहून त्यांनी आपल्या गावातील शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने त्याचे सवंगडी पुण्यावरून येऊन दीपक फाटक, पुंडलिक मासुरकर, विनोद फाटक हे सर्वजण मिळून रोख स्वरूपात या गावकर्यांना मदत करून एक मायेचा आधार दिला. त्यामुळे त्याचे गावातून कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment