शिवसेनेच्या प्रयत्नांतून कोलीक-तुर्केवाडी व्हाया चंदगड बससेवेला प्रारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

22 August 2019

शिवसेनेच्या प्रयत्नांतून कोलीक-तुर्केवाडी व्हाया चंदगड बससेवेला प्रारंभ

कोलिक बसच्या शुभारंभ प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर व शिवसैनिक.
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
तुर्केवाडी फाटा (ता. चंदगड) मार्गे तुडये -कोलीक बंद असणाऱ्या महाराष्ट्र परिवहन महामंडळाची बसचा शुभारंभ शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर व युवा सेनेचे तालुका अधिकारी पिणु पाटील यांच्या  शुभास्ते  श्रीफळ वाढवून करण्यात आले. 
या सेवेसाठी तुडये, कोलिक , म्हाळुंगे ,मळवी , हजगोळी, माडवळे, तुर्केवाडी गावातील अनेक वेळा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी अथक प्रयत्न केले. तसेच शिवसेनेचे मा.दिवाकरजी रावते परिवहन मंत्री व संपर्क नेते पश्चिम महाराष्ट्र यांच्या  आशीर्वादाने, संपर्क प्रमुख अरूण भाई दुधवाडकर, खासदार संजय दादा मंडलिक, जिल्हा प्रमुख मा विजय दादा देवणे साहेब यांच्या  सततच्या प्रयत्नांने व पाठपुरावाने आज चंदगड तालुक्यावरील गावातील ग्रामस्थांमध्ये व विशेष काॅलेज मधील विद्यार्थी -विद्यार्थिनीची हेळसांड होत होती. बस चालु झाल्याने त्यांच्यामध्ये समाधान दिसत  होते.

या शुभारंभ प्रसंगी शिवसेना ग्राहक तालुका प्रमुख राजू  रेडेकर,माजी उपसरपंच भरमाणणा गावडे, ग्रामपंचायत सदस्य जी. ओ.गावडे साहेब, पोलीस पाटील सौ.कांबळे ताई यांच्या वतीने बसची पुजा करण्यात आली. यावेळी पंचक्रोशीतील सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच  शिवसेनेचे कामगार सेनेचे कलापा निवगिरे, महाराष्ट्र एसटी कामगार सेना  चंदगड निरजंन सांळुखे, नंदकुमार चौगुले,कामगार युनियन संघटनेचे अध्यक्ष  पिंटु हजगोळकर, विठ्ठल गुरव, नामदेव देसाई, महेश सांबरेकर, दतु वाडीकर, संभाजी हजगोळकर, वाहनचालक  अमजद बागाद, वाहक शेख, गजानन गावडे, बाळू बोकडे, विजय वैतागवाडी, परशराम आदी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment