![]() |
शिरोली-सत्तेवाडी रोडवर पाण्यातूनच धोकादायक प्रवास वाहनधारक करत आहेत. |
चंदगड तालुक्यात जुलै महिण्यात झालेल्या पावसामध्ये शिरोली - सत्तेवाडी रस्त्यावर असलेल्या ओढ्याला पाणी आले . त्यामूळे आजतागायत येथील मोरीवरचा रस्ता गेल्या विस दिवसापासून पाण्याखालीच आहे.
अडकुर (ता. चंदगड) येथून इब्राहीमपूर जाणाऱ्या रस्त्यावर शिरोली नजीक ओढ्यावर छोटीशी मोरी बांधण्यात आली आहे .थोडासा जरी पाऊस झाला तरी येथील रस्ता पाण्याखाली जातो. महापूरामध्ये तर येथे पाच फूट पाणी होते . आता महापूर ओसरला असला तरीही येथील रस्त्यावरून पाणी वाहत आहे. येथे असणाऱ्या पाईपमध्ये व आजूबाला मोठया प्रमाणात गाळ साचला असल्याने पाण्याचा विसर्ग व्यवस्थीत होत नाही. त्यामूळे येथील रस्ता पाण्याखाली आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक चालू असल्याने वाहनधारकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे .एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच संबधीत विभागाने येथील गाळ काढून पाण्याचा अडथळा दूर करावा अशी मागणी शिरोली, सत्तेवाडी, कानडी, पोवाचीवाडी, अलबादेवी, अडकूर, उत्साळी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
No comments:
Post a Comment