पावसाची विश्रांती, सर्व मार्ग वाहतुकीला खुले, 21 लाखांचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

10 September 2019

पावसाची विश्रांती, सर्व मार्ग वाहतुकीला खुले, 21 लाखांचे नुकसान


चंदगड / प्रतिनिधी
गेले चार-पाच दिवस सुरु असलेल्या पावसाने आज शहर परिसरात आज दिवसभर विश्रांती दिली. त्यामुळे जनजीवन हळुहळु पूर्वपदावर येत आहे. कालपर्यंत कोनेवाडी बंधारा पाण्याखाली होता. आज पावसाने उसंत दिल्याने कोनेवाडी बंधाराही वाहतुकीला खुला झाला आहे. चंदगड तालुक्यात अतिवृष्टीमुळे तीनदा पुर आला होता. दुसऱ्या वेळी आलेल्या महापुरामुळे तालुक्यात अनेक घरांची पडझड होवून संसार उघड्यावर पडले होते. पुरामुळे शेतीचे कुजून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महापुराची भयानकता अनुभवलेल्या नागरीकांना जोराचा पाऊस सुरु झाल्यानंतर मनात धस्स होत आहे. पुर ओसरला असला तरी पुराच्या आठवणी मात्र लोकांच्या मनात आजही ताज्या आहेत. आज सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या चोविस तासात तालुक्यात सरासरी 19.16 मिमी तर आतापर्यंत सरासरी 3069.83 पावसाची नोंद चंदगड तालुक्यात झाली आहे. सर्कलनिहाय पाऊस - चंदगड - 21मिमी (3765), नागणवाडी -19मिमी (2967), माणगाव -10मिमी (1585), कोवाड -08मिमी (1576), तुर्केवाडी -21मिमी (3187) व हेरे -36मिमी (5339).
                                      सोमवारी दिवसभरात पावसामुळे 21 लाखांचे नुकसान......
सोमवारी दिवसभात मौजे जंगमहट्टी येथील रमेश कोणेरी सुतार यांच्या घराची भिंत पडून 50000 नुकसान, मौजे जंगमहट्टी  येथील नारायण गोपाळ कांबळे  यांच्या घराची भिंत कोसळून 50000 नुकसान, मौजे माडवळे येथील नारायण आणू पाटील यांच्या राहत्या घराची भिंत कोसळून 15000 नुकसान, मौजे जंगमहट्टी  येथील गणपती सखाराम राऊत  यांच्या घराची भिंत पडून 10000 नुकसान, मौजे जंगमहट्टी येथील हणमंत धोंडिबा शिंदे घराची भिंत कोसळून 10000 नुकसान, मौजे तुडिये येथील मारुती कल्लापा पाटील घराची भिंत कोसळून 25000 नुकसान, मौजे हाजगोळी येथील मारुती खाचू गावडे घराची भिंत कोसळून 10000 नुकसान, मौजे हाजगोळी येथील केशव खचू गावडे घराची भिंत कोसळून 10000 नुकसान,  मौजे हाजगोळी येथील नामदेव भिमाना गावडे घरची भिंत कोसळून 10000 नुकसान व मौजे इनाम सावर्डे येथील बाबू गौरोजी गावडे घराची भिंत कोसळून 20000 नुकसान झाले आहे. 


No comments:

Post a Comment