![]() |
कोल्हापूर जिल्हा कांजूर -भांडूप रहिवाशी विकास मंडळाकडून तेऊरवाडी आपत्तीग्रस्थाना मदतीचे वाटप करताना सिताराम चौगुले, सुरेश केसरकर व इतर. |
कोल्हापूर जिल्हा कांजूर - भांडूप रहिवाशी विकास मंडळ मुंबई यांचेकडून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील पूरग्रस्तांना मदत करण्यात आली. गडहिंग्लज, चंदगड व आजरा तालुक्यातील जवळपास तीसहून अधिक गावातील पूरग्रस्थ व आपत्तीग्रस्थांना सोलापुरी चादर, तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये तेऊरवाडी, दुंडगे, कोवाड, राजगोळी, अडकूर, निट्टूर, गणुचीवाडी, बटकणंगले, लाकूरवाडी, गजरगाव, इंचनाळ, सांबरे, निंगुडगे आदी गावांमध्ये मदतीचे वाटप करण्यात आले. यासाठी मंडळाचे अध्यक्ष सिताराम चौगुले, दशरथ गिलबिले, शामराव शिंत्रे, मारूती मोरे, सुरेश केसरकर, विष्णू फडके, शिवाजी खामकर, धोंडिबा माने, अजित खामकर, सागर दंडवत, उत्तम मुळीक आदि कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment