चंदगड मुस्लिम समाजाकडून कोवाड येथील पुरग्रस्तांना 51 हजारांची मदत - चंदगड लाईव्ह न्युज

10 September 2019

चंदगड मुस्लिम समाजाकडून कोवाड येथील पुरग्रस्तांना 51 हजारांची मदत

कोवाड (ता. चंदगड) येथील पुरग्रस्तांना चंदगड मुस्लिम समाजाच्या वतीने 51 हजारांची मदत देताना पदाधिकारी. 
चंदगड / प्रतिनिधी 
चंदगड तालुक्यात आलेल्या महापुराचा सर्वात जास्त फटका कोवाड गावाला बसला. येथील शेकडो एकर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी देशोधडीला लागला. दुकाने पाण्यात बुडाल्याने कोट्यावधीचे नुकसान झाले. त्यामुळे येथील व्यापारी उध्वस्थ झाला. अनेक नाकरीकांची घरे पडल्याने संसार उघड्यावर पडले. अशा संकटात सापडलेल्या नागरीकांना सामाजिक बांधीलकीतून मदत करण्याचे चंदगड येथील मुस्लिम समाजाने ठरविले. कोवाड (ता. चंदगड) येथील पुरग्रस्त नागरीकांना मुस्लीम समाज चंदगड यांच्याकडून ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत कोवाडच्या सरपंच सौ. अनिता कल्लाप्पा भोगण यांच्याकडेचंदगड मुस्लिम समाजाचे अध्यक्ष गफार शेरखान यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी  चंदगडचे आमिरसाब आल्लाबक्ष मदार, नासीर मुल्ला, कलीम मदार, शानुर मदार, बाबासाहेब मुल्ला व जिल्हा परिषद सदस्य कलाप्पा भोगण व इतर नागरीक उपस्थित होते.


No comments:

Post a Comment