स्वामी प्रतिष्ठानच्या वतीने कोवाडमधील 27 पुरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 5 हजारांची मदत - चंदगड लाईव्ह न्युज

11 September 2019

स्वामी प्रतिष्ठानच्या वतीने कोवाडमधील 27 पुरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 5 हजारांची मदत

कोवाड (ता. चंदगड) येथे घर पडलेल्या कुटुंबांना शिवाजी पाटील यांच्या हस्ते मदतीचा 5 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.
कोवाड / प्रतिनिधी
पंधरा दिवसापूर्वी अतिवृष्टीने निर्माण झालेल्या महापुरात कोवाड (ता. चंदगड) येथील अनेक नागरीकांची घरे उध्वस्थ झाले होते. संसार उघड्यावर पडलेल्या या पुरग्रस्तांना मदतीचा हात देत ठाणे येथील स्वामी प्रतिष्ठानचे व माथाडी कामगार संघाचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी कोवाडमधील 27 कुटुंबांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची रोख स्वरुपातील मदत केली.
कोवाड येथील माऊली मंदिर हि मदत वाटप करण्यात आली. पुर आलेल्या कालावधीमध्ये शिवाजी पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यासह चंदगड मतदारसंघाचा दौरा करुन नुकसानीची पाहणी केली होती. त्यावेळी तालुक्यातील पुरबाधिक कुटुंबांना प्रत्यक्ष भेटी घेवून वस्तु स्वरुपातील तातडीच्या जीवनावश्यक वस्तु दिल्या. त्याचवेळी त्यांनी पुरामुळे संपुर्णत: घरे पडलेल्या तालुक्यातील 25 कुटुबांची घरे बांधून देण्याचे जाहीर केले होते. या संकल्पपुर्तीचा शुभारंभ बसर्गे (ता. चंदगड) येथील अंध कलाप्पा कांबळे या कुटुंबाला रोख 25 हजार रुपयांचा पहिला हप्ता देवून केला. त्यानंतर धुमडेवाडी, कोवाड, राजगोळी येथेही घरे पडलेल्या कुटुंबांना मदत दिली. सरचिटणीस अंकुश कदम, भाजपचे तालुकाध्यक्ष नामदेवा पाटील, कार्यकारीणी सदस्य गोपाळराव पाटील, माजी सभापती शांताराम पाटील, जि. प. सदस्य ॲड. हेमंत कोलेकर, कलाप्पा भोगण, संगयोचे सुनिल काणेकर, कोवाड भाजपा शहर प्रमुख सुरेश वांद्रे, रामा यादव, भरमु पाटील, ॲड. विजय कडुकर, रवि बांदिवडेकर, राजकुमार पाटील, संजय कुंभार आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment