![]() |
कोवाड (ता. चंदगड) येथे पुरग्रस्त कोवाडमधील दुकानदारांना भाजपच्या वतीने रोख स्वरुपात आर्थिक मदत देताना शिवाजीराव पाटील, गोपळराव पाटील, हेमंत कोलेकर, नामदेव पाटील व इतर कार्यकर्ते.
|
कोवाड / प्रतिनिधी
महापुरात कोवाड बाजारपेठेतील उध्वस्थ झालेल्या दुकानदारांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने रोख स्वरुपात मदत देवून मदतीचा हातभार लावला. पुरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी पालकमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोवाड येथील बाजारपेठेला भेट दिली होती. यावेळी बाजारपेठेतील उध्वस्थ झालेल्या दुकानदारांनी आपल्या व्यथा पालकमंत्री पाटील यांच्यासमोर मांडल्या होत्या. त्यावेळी पालकमंत्र्यांनी सरकारबरोबरच भाजपकडून मदतीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार कोवाड (ता. चंदगड) येथील 275 व्यापाऱ्यांना आर्थिक स्वरुपातील मदत देण्यात आली.
काल कोवाड येथील माऊली मंदिरात या रोख स्वरुपात आर्थिक मदत स्वामी प्रतिष्ठानचे व माथाडी कामगार संघाचे अध्यक्ष शिवाजी पाटील, राज्य कार्यकारणी सदस्य गोपाळराव पाटील, जि. प. सदस्य ॲड. हेमंत कोलेकर, तालुकाध्यक्ष नामदेव पाटील यांच्या हस्ते व्यापाऱ्यांना वाटप करण्यात आले. या मदतीमुळे पालकमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या आश्वासनांची पुर्तता केल्याने दुकानदारांच्यातून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी सरचिटणीस अंकुश कदम, माजी सभापती शांताराम पाटील, जि. प. सदस्य, कलाप्पा भोगण, संगयोचे सुनिल काणेकर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दयानंद सलाम, दशरथ साळुंखे, विजय मनवाडकर, रामा व्हन्याळकर, कोवाड भाजपा शहर प्रमुख सुरेश वांद्रे, संजय पाटील, रामा यादव, गोविंद पाटील, भरमु पाटील, ॲड. विजय कडुकर, रवि बांदिवडेकर, राजकुमार पाटील, संजय कुंभार यांच्यासह व्यापारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment