लक्कीकट्टे येथील तलावाच्या पाण्याचे माजी मंत्र्याच्या हस्ते पाणीपूजन - चंदगड लाईव्ह न्युज

11 September 2019

लक्कीकट्टे येथील तलावाच्या पाण्याचे माजी मंत्र्याच्या हस्ते पाणीपूजन

लक्कीकट्टे (ता. चंदगड) येथील लघुपाटबंधारे तलावातील पाण्याचे पूजन करताना माजी राज्यमंत्री भरमू पाटील व इतर कार्यकर्ते. 
चंदगड / प्रतिनिधी
युती सरकारच्या काळात व तत्कालीन रोजगार हमी योजना मंत्री भरमू पाटील यांच्या प्रयत्नातून पुर्णत्वास गेलेल्या लक्कीकट्टे (ता. चंदगड) येथील लघुपाटबंधारे तलावातील पाण्याचे पूजन माजी मंत्री भरमूआण्णा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 
1997 साली युती सरकारच्या काळात कृष्णा खोरे महामंडळा अंतर्गत लक्कीकट्टे येथील लघुपाटबंधारे तलावाचे काम पुर्ण करण्यात आले. लक्कीकट्टे येथील या तलावामुळे लक्कीकट्टेसह माणगाववाडी, हुंबरवाडी, म्हाळेवाडी, मलतवाडी, शिवनगे येथील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली झाला. 2005 साली हा प्रकल्प पहिल्यांदा भरला होता. त्यानंतर 14 वर्षानंतर 9 सप्टेंबर 2019 रोजी हा प्रकल्प भरल्याने ओव्हरफ्लो झाला. त्यामुळे या तलावातील पाण्याचे पूजन माजी मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच रेश्मा कांबळे, विलास थोरवत, दयानंद रेडेकर, मारुती धुमाळे, उपसरपंच विलास रेडेकर, शामराव रेडेकर, विनोद पाटील, संजय रेडेकर, आप्पाजी सुतार, पांडुरंग धुमाळे, नामेदव पाटील, मारुती पट्टेकर आदी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment