दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी आदर्श माजी विद्यार्थी संघटना (चंदगड) व नेहरू युवा केंद्र, कोल्हापूर (युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यामाने युवक संसद व भाषण स्पर्धेचे आयोजन केले होते.
कोल्हापूर जिल्ह्यात तालुकास्तर व जिल्हास्तरावर वय १८ ते २९ या गटातील युवक व युवती यांच्यासाठी ``देशभक्ती व राष्ट्रनिर्माण सबके साथ सबका विकास`` या विषयावर भाषण स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेचा उद्देश युवकांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण करणे त्यांचे संवाद, कौशल्य, व्यक्तिमत्व विकासाला वाव देणे हा आहे. स्पर्धा तालुका, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर होणार असून स्पर्धा हिंदी व इंग्रजी या दोन भाषेमध्ये होणार आहे. स्पर्धेसाठी भाग घेणारे युवक व युवती हे कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवाशी असावेत. येताना आधारकार्ड झेरॉक्स व फोटो आणावा. स्पर्धेकारिता पुढील प्रमाणे पारितोषिके दिली जाणार आहेत. जिल्हास्तरासाठी अनुक्रमे ५०००, २०००, १०००. राज्यस्तरासाठी अनुक्रमे २५०००, १००००, ५०००. राष्ट्रीयस्तरासाठी २०००००, १०००००,५००००. तालुकास्तरीय भाषण स्पर्धा 13 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी नऊ वाजता यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी येथे होणार असून सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. आपल्या महाविद्यालयातील युवक व युवतींना स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करून शासकीय उपक्रमास योग्य ते सहकार्य करावे. इच्छुकांनी अधिक माहीतीसाठी नेहरू युवा केंद्र, कोल्हापूर (युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार) कमलेश जाधव व रेहान जमादार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment