चिंचणे ग्रामस्थांचा पंचायत समिती समोर ठिय्या आंदोलनाचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

12 September 2019

चिंचणे ग्रामस्थांचा पंचायत समिती समोर ठिय्या आंदोलनाचा इशारा

चिंचणे ग्रामस्थांच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलनाचे निवेदन प्रशासनाला देताना पी .आर. देशमूख , महेश कांबळे , रणजित पाटील , गुंडू कांबळे
तेऊरवाडी / प्रतिनिधी
मौजे चिंचणे (ता. चंदगड) येथील महार वस्तीसाठी आलेल्या निधीचा सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेविका यानी गैरवापर केला असून या सर्वावर कारवाई न केल्यास सोमवार १६ सप्टेंबर पासून चंदगड पंचायत समिती समोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा चिंचणे ग्रामस्था सह भारिप बहुजन महासंघाचे चंदगड तालूका अध्यक्ष पी. आर. देशमुख यानी निवेदनाद्वारे चंदगडचे तहसिलदार, गटविकास अधिकारी व पोलिस निरीक्षकाना दिला आहे .
निवेदनात पुढे म्हटले आहे की , चिंचणे येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत आलेला निधी सरपंच भाग्यश्री सुतार , ग्रामसेविका सुनंदा मर्णहोळकर, उपसरपंच किरण पाटील, सदस्य विष्णू तरवाळ , तुकाराम पाटील यानी ग्रामस्थांचा खोट्या सहया  व बोगस ठराव करून निधीचा गैरवापर केला आहे . या संदर्भात माहितीचा अधिकार वापरून बोगस सहया प्रकरण उघडकीस आणले आहे . ग्रामस्थानी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे .पंचायत समिती केवळ संबधीतावर कोणतीही कारवाई न करता चर्चाच करत आहे . त्यामूळे या सर्व दोषिवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत चंदगड तालूका भारिप बहूजन महासंघ व चिंचणे  ग्रामस्थांच्या वतीने चंदगड पंचायत समिती समोर सोमवार दि १६ सप्टेंबर पासून बेमूदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे . निवेदनावर तालूका अध्यक्ष पि .आर. देशमूख , महेश कांबळे , गुंडू कांबळे , महेश कांबळे , संदिप  गणाचारी आदिँच्या सहया आहेत.





No comments:

Post a Comment