माणगांवच्या भजनी मंडळाचे विविध भजन स्पर्धेत उल्लेखनीय यश - चंदगड लाईव्ह न्युज

13 September 2019

माणगांवच्या भजनी मंडळाचे विविध भजन स्पर्धेत उल्लेखनीय यश


चंदगड / प्रतिनिधी
सार्वजनिक वाचनालय मंडळ, बेळगाव येथे नुकताच झालेल्या भजनी मंडळाच्या संगीत भजन स्पर्धेत माणगांव (ता. चंदगड) येथील संत तुकाराम भजनी मंडळाने स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला. वाचनालय मंडळाचे अध्यक्ष गोविंद राऊत, कृष्णा शहापूरकर, नेताजी जाधव,  ॲड. आय. जी. मुचंडी यांच्या हस्ते रोख रूपये दहा हजार व चषकासह मानपत्र देवुन मंडळाचा गौरव करण्यात आला.
दरम्यान सुंडी येथे झालेल्या भजन स्पर्धेत याच माणगावच्या मंडळाने द्वीतीय क्रमांकाचे बक्षिस मिळविले. स्पर्धेतील शंकर नारब यांना उत्तम गायक म्हणून रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. माणगांवच्या या मंडळाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ करंबळ (ता. खानापूर, जि. बेळगाव) येथे झालेल्या संगीत भजन स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला. मंडळाचे  रोख रक्कम पाच हजार रुपये देऊन गौरविण्यात आले. उत्तम तबला वादक म्हणून स्वप्नील गडदे व पंखवाज वादक किशोर बामुचे यांना मंडळाचे अध्यक्ष शिवाजी नारायण पाटील,शांताराम घाडी व धोंडू निर्वेकर  यांच्या हस्ते रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
तसेच या मंडळाने श्री शिवराय गणेशोत्सव मंडळ शिवाजीनगर,लोंढा,ता.खानापूर. जि.बेळगाव येथे झालेल्या संगीत भजन स्पर्धेत व्दितीय क्रमांकाचे पाच हजार एक रुपयाचे बक्षीस पटकावले मंडळाचे देणगीदार, उद्योजक सिताराम सुतार(शिरोलीकर)यांच्या हस्ते रोख रक्कम, चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. हर्मोनियम वादक परशराम बेनके, तबला वादक स्वप्निल गडदे,पंखवाज वादक,नौकुडकरव पुंडलिक बामुचे, दत्ता गोंधळी, शंकर नारब,मारुती चिंचणगी,पुंडलिक रोड,ईराप्पा मेटकर,यल्लाप्पा बेनके, अनिकेत बागडी,वैजू बागडी, वैभव बेनके,यांनी सहभाग घेतला होता, शंकर व्हन्याळकर,प्रविण फडके,स्वप्नील कुंभार, प्रकाश बागडी, शिवाजी व्हन्याळकर, तुकाराम पट्टेकर,यांचे  सहकार्य केले.मारुती चिंचणगी यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment