मुरकुटेवाडी येथे मीनी अंगणवाडीमध्ये पोषण महासप्ताह विविध कार्यक्रमांचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

13 September 2019

मुरकुटेवाडी येथे मीनी अंगणवाडीमध्ये पोषण महासप्ताह विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुरकुटेवाडी (ता. चंदगड) येथे पोषण महासप्ताह प्रसंगी उपस्थित मान्यवर.
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
एकात्मीक बाल विकास सेवा-चंदगड अंतर्गत मुरकुटेवाडी ता.चंदगड येथे मिनी अंगणवाडी क्र. ३७ मध्ये " पोषण महासप्ताह" कार्यक्रम साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. शितल पाटील यांनी केले.पुष्प देऊन स्वागत गीतांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच सौ. शुभांगी मुरकुटे होत्या.
यावेळी अंगणवाडी नवागतांचे स्वागत , गरोदर मातांची ओठी भरणे , किशोरी मेळावा , हळदी-कुंकू , भाषण स्पर्धा इ. कार्यक्रम घेण्यात आले. प्रमुख वक्ते कमलेश जाधव यांनी आरोग्य कसे असावे तर साहिल पाटील  यांनी आई विषयी व्याख्यान सांगून सर्वांची मने जिंकली. श्रावणी सुरूतकर हीने " माझी आई " या विषयावर व्याख्यान दिले. गणेश चव्हाण (वय-४) व समीधा आपके (वय-४) यांचे जन्मदिवस साजरे करण्यात आले.तुळजाई से. सं. मार्फत अंगणवाडीला भेटवस्तू देण्यात आली. कार्यक्रमाला शशिकांत पेडणेकर यांचे सहकार्य लाभले. यावेळी उपसरपंच सौ. संगीता गोजगेकर,  ग्रा.पं.सदस्य दिलिप आपके , नामदेव चव्हाण, रामू पोटे, सट्टूप्पा भालेकर, भरमाण्णा सुरूतकर व सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती. आभार सौ. ललिता सुरूतकर यांनी मांडले.


No comments:

Post a Comment