![]() |
अडकूर (ता. चंदगड) येथील श्री शिवशक्ती हायस्कूलमध्ये जंत नाशक गोळ्यांचे वितरण करताना एस. के. हरेर व उपस्थित विद्यार्थी. |
राष्ट्रीय जंत नाशक मोहिमेअंतर्गत अडकूर (ता. चंदगड) परिसरातील विविध शाळामध्ये जंतनाशक गोळ्यांचे विद्यार्थ्याना वाटप करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र अडकूरचे वैदयकिय अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील सर्व विद्यार्थ्याना आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जंत नाशक गोळ्या वाटण्यात आल्या. या गोळ्या चावून खाण्याचा सूचना दिल्या होत्या. त्याबरोबरच विद्यार्थ्यांना काही त्रास झाल्यास वैदयकिय पथक तैनात होते. आज येथील श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये एस. के. हरेर, डी. एल. पाटील, बंकट हिशेबकर यांच्या हस्ते या गोळ्यांचे वितरण करण्यात आले. याच बरोबर आमरोळी हायस्कूल, सातवणे येथील श्री चाळोबा विद्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला.
No comments:
Post a Comment