"तरुणांंची देशभक्ती देशाला महासत्ता बनवेल" - प्रा. डॉ. मधुकर जाधव - चंदगड लाईव्ह न्युज

13 September 2019

"तरुणांंची देशभक्ती देशाला महासत्ता बनवेल" - प्रा. डॉ. मधुकर जाधव

"तालुकास्तरीय युवा संसद" "तालुका स्तरीय भाषण स्पर्धा" संपन्न
तालुकास्तरीय युवा संसद व तालुका स्तरीय भाषण स्पर्धा देशभक्ती व  राष्टनिर्माण या विषयावर बोलताना प्रा. डॉ. मधुकर जाधव व इतर मान्यवर.
चंदगड / प्रतिनिधी 
जगात सर्वात जास्त भारत देशांमध्ये आहेत देश प्रेम, राष्ट्रवाद, देशसेवा या त्रीसूत्रावर भारतीय युवक श्रेष्ठ आहे. इतिहासाच्या पानापानावर तरुणाईच्या देशभक्तीचा खुणा आहेत  .स्वातंत्र्यापासून आजपर्यंत तरुणाईचा देशभक्तीने भारत भारताची मान उंचावली आहे .आजचा तरुण वर्ग प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. या तरुणाईच्या शक्तीतच भारताच्या महानतेची बिजे आहेत" असे प्रतिपादन प्रा.डॉ. मधुकर जाधव यांनी प्रमुख मार्गदर्शक वक्ते म्हणून हलकर्णी (ता. चंदगड) येथील गु. गु. वि. पाटील कनिष्ठ महाविद्यालय यशवंतराव चव्हाण महाविद्यालय भारत सरकार युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय अंतर्गत नेहरु युवा केंद्र कोल्हापूर व  यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी आदर्श माजी विद्यार्थी संघटना आयोजित तालुकास्तरीय युवा संसद व तालुका स्तरीय भाषण स्पर्धा देशभक्ती व राष्ट्रनिर्माण या विषयावर बोलताना प्रमुख वक्ते म्हणून केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. वाय. निंबाळकर होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दौलतचे उपाध्यक संजय पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात वृक्षाला पाणी घालून मान्यवरांनी केले. प्रास्ताविक नेहरु युवा केंद्र तालुका प्रतिनिधी कमलेश जाधव यांनी केली. या स्पर्धेत ऋतुजा पाटील (डुक्कुरवाडी)  प्रथम क्रमांक, तर रायमन मंतेर (सुरुते) यांनी व्दितीय तसेच  जोतिबा गुरव (कलिवडे) यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष संजय पाटील प्रा. डॉ. पी. वाय. निंबाळकर सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. यु. एस. पाटील नेहरू युवा केंद्र तालुका प्रतिनिधी रेहान जमादार, प्रा. एस. एन. खरुजकर, प्रा. आर. बी. गावडे आदी होते. सुत्रसंचालन दिपाली पाटील यांनी केली. आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. यु. एस. पाटील यांनी मानले. यावेळी प्रा. ए. बी. मगदूम,  प्रा. एस. एन. पाटील, प्रा. डॉ. राजेश घोरपडे  प्रा. अनंत कलजी, प्रा. सौ. जे. एम. उत्तुरे आधी प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने होते. परीक्षक म्हणून प्रा. एस. एन. खरुजकर व प्रा. सौ. जे. एम.उत्तुरे यांनी काम पाहिले. 


No comments:

Post a Comment