![]() |
जी. एन. गणाचारी |
डुक्करवाडी (ता. चंदगड) येथील रहिवाशी व नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळ माणगांवचे सहसचिव व माजी मुख्याध्यापक जी. एन. गणाचारी (वय-72) यांचे आज (ता. 13) दुपारी दुःखद निधन झाले. राजेश पाटील यांचे ते अत्यंत विश्वासू सेवक म्हणून संपूर्ण चंदगड तालुक्याला परिचित होते. विज्ञान विषयामध्ये त्यांचा हातखंडा होता. स्वभावाने खूप प्रेमळ, धार्मिक, शांत व सुस्वभावी असणारे गणाचारी विद्यार्थीप्रीय हाडाचे शिक्षक होते. त्यांच्या या स्वभावामुळेच नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या सहसचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या पदाची धुरा त्यांनी यशश्वीपणे सांभाळली होती. त्यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. संपूर्ण चंदगड तालुका आज दुःखात बुडाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहीत मुलगी, मुलगा, सुन व नातवंडे असा परिवार आहे.
No comments:
Post a Comment